police fir
police fir sakal media
मुंबई

मुंबई : खोटी सही करुन बोगस जमीन व्यवहार करणाऱ्या बड्या व्यवसायीकावर गुन्हा

नरेश शेंडे

मुंबई : एका ७४ वर्षीय नागरिकाची खोटी सही (forging signature) करुन आणि दुसऱ्या एका व्यक्तीचा फोटो लावून विलेपार्लेतील एका जागेचं बोगस कंन्वेयंस डीड केल्याप्रकरणी बड्या व्यवसायीकासह कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल (police complaint filed) करण्यात आला आहे. देवेन रघानी, न्यानेश परीख अशी आरोपींची नावे आहेत. जिरोम डिसुजा यांनी याप्रकरणी आरोंपीविरोधात तक्रार केल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसंच डिसुजा यांनी याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयातही (Magistrate court) तक्रार दाखल केलीय. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. (FIR against real estate businessman for forging senior citizen's signature in land conveyance deed)

याबाबत सविस्तर वृत्त असं की, देवेन रघानी, न्यानेश परीख आणि एका खासगी कंपनीच्या संचालकांनी डिसुजाच्या नावाने खोटी सही करुन तसंच दुसऱ्या व्यक्तीचा फोटो लावून कन्वेयंस डीड तयार केलं. या दस्तामध्ये डिसुजाने आपल्या मालकीची २० टक्के भागीदारी विक्री केली असल्याचं त्यांनी नमूद केलं. अशी माहिती एफआयआर मध्ये देण्यात आलीय.

"रघानीच्या विरोधात अशाच प्रकारचे गुन्हे मुंबईत दाखल आहेत. पोलीस या गुन्ह्यात आरोपी असणाऱ्यांची सखोल चौकशी करत आहेत." अशी माहिती एयरपोर्ट पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलीय. तर दुसरीकडे डिसुजा यांनी लावलेले आरोप रघानीने फेटाळले आहेत. रघानीनं म्हटलंय की, "आम्ही जिरोम डिसुजा यांचा भाचा एल एन डिसुजा यांच्याकडून २००८ मध्ये जमिन खरेदी केली होती. २०१० मध्ये हा व्यवहार रद्द झाला. ९ लाख रुपये आम्ही एल एन डिसुजाला दिले होते. या तक्रारी विरोधात आम्हा न्यायालयात धाव घेणार आहोत."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT