FIR registered against Uddhav Thackeray faction leader Mangesh Satamkar for allegedly raping a woman  esakal
मुंबई

Mumbai Crime News : मुंबईत ठाकरे गटाच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा! राजकीय वर्तुळात खळबळ

रोहित कणसे

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस स्टेशन येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून त्याने अनेकदा तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये आयपीसीच्या कलम 376(2)(एन), 312, 420, 504, 506(2) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान 29 वर्षीय महिलेने अत्याचारचा गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पीडितेचा आरोप काय आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश सातमकर यांनी त्यांच्या घरी कोणी नसताना पीडीतेवर अत्याचार केला. तसेच पीडितेला लग्नाचे आमिष दिले. गेल्या वर्षी मंगेश सातमकर हे पीडितेला घेऊन लोणावळ्याला घेऊन गेले होते. लोणावळ्यातही अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

अत्याचारामुळे गर्भवती झाल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर सातमकर यांनी गर्भपाताच्या गोळ्याचा खाण्याचा सल्ला दिल्याचा आरोप देखील करण्यात आला असून दररोज गर्भपाताच्या गोळ्या खाल्यामुळे पीडितेच्या मृत्रपिंडाला सूज आल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झालं आहे.

यानंतर पीडित महिलेने सामाजिक संस्थेशी मदत मागितली. त्यानंतर पीडित महिलेने माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्याविरोधात अँटॉप हिल पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT