Fire Accident Sakal
मुंबई

Mumbai : साखरपुड्याचे फटाके फुटले अन् गावात लागली आग; वाहने जळून खाक, Video

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : टिटवाळ्या जवळील सांगोडा गावात एका साखरपुड्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमानिमित्त फटाक्यांची आतिषबाजी गावात करण्यात आली होती. या पेटलेल्या फटाक्यांच्या ठिणग्या जवळच असलेल्या सुक्या गवतावर पडल्या आणि गवताने पेट घेतला. झपाट्याने पसरलेल्या या आगीने क्षणात रौद्ररुप धारण केल्याने गावकऱ्यांची एकच धावपळ झाली. या आगीच्या भक्ष्यस्थानी येथे उभी केलेली काही वाहनेही आली. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी पंचनामा करत तपास सुरु केला आहे.

कल्याण ग्रामीण तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सांगोडा गावात साखरपुड्याचा कार्यक्रम सुरु होता. वर वधू पक्षाच्या यजमानांची लगबग गावात सुरु होती. साखरपुडा पार पडल्यानंतर आनंद द्विगुणीत करण्यासाठी त्या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. आकाशात फुटणारे फटाके साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. या फटाक्यांच्या ठिणग्या खाली पडत होत्या. या भागात सुके गवत असल्याने फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे सुके गवत पेटले. सुके गवत, रणरणते उन आणि वारा यामुळे ही आग झपाट्याने पसरली.

या आगीत काही वृक्ष आणि येथे उभी केलेली एक दोन वाहने सापडली. यामध्ये दुचाकी व कारचा समावेश आहे. गवताने पेट घेतल्यानंतर ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली. आग लागल्याचे समजताच एकच गोंधळ उडाला. काही तरुण मंडळींनी सुरुवातीला झाडाच्या झावळ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्याने पाण्याचा मारा करत नंतर आग विझविण्यात आली.

तोपर्यंत या आगीची झळ येथे पार्क केलेल्या काही वाहनांना बसली होती. या वाहनांचे जळून मोठे नुकसान झाले आहे. समाज माध्यमावर या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कल्याण ग्रामीण तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत याचा तपास सुरु केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT