fire 2.jpg 
मुंबई

प्रभादेवीत इलेक्ट्रीक वायरच्या गोडाऊनला भीषण आग, फायर ब्रिगेडच्या १५ गाड्या घटनास्थळी

दीनानाथ परब

मुंबईत सध्या आगीच्या मालिकांचं सत्र सुरु आहे. काल भांडूपच्या ड्रीम मॉलला आग लागली होती. या अग्नि दुर्घटनेत सनराईज रुग्णालयातील ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. आज शनिवारी सकाळी प्रभादेवी येथील इलेक्ट्रीक वायरच्या गोडाऊनमध्ये भीषण आग भडकली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी पावणेसहाच्या सुमारास वीर सावरकर मार्गावरील पाचमजली गमन हाऊसच्या तळघरात आग भडकली. 

सकाळी नऊच्या सुमारास मुंबई अग्निशमन दलाने ही लेव्हल तीनची आग असल्याचे जाहीर केले. गमन हाऊस ही प्रभादेवी सेंचुरी बाजारजवळ असलेली एक जुनी इमारत आहे. अग्निशमन दलाच्या १५ गाडया घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

पोलीस, पालिका कर्मचारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी सज्ज आहेत. आगीच्या ज्वाळांमुळे आसपासच्या भागात धुराचे मोठे लोट दिसत आहेत. गमन हाऊस अग्नि दुर्घटनेत अजूनपर्यंत कुठलीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारणही अजून स्पष्ट झालेले नाही.

ड्रीम मॉलला आग  
काल भांडूप येथील ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयाला भीषण आग लागली होती. या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला. हे सर्व कोविड रुग्ण होते.  या मॉलमध्ये सनराईज हे कोविड रुग्णालय आहे. सुरुवातीला या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २५ पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न केले. अखेर दुपारी ही आग नियंत्रणात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : तुमची काही तक्रार आहे का? खरातला न्यायमूर्तींनी विचारलं, कोर्टात सुनावणीवेळी काय घडलं?

युद्धाच्या झळा सोसेनात, पाकिस्ताननं केलं लॉकडाऊन! दुकाने, रस्ते बंद... लग्नसोहळ्यांनाही ब्रेक

निखिल बने पाठोपाठ महाराष्ट्राची हास्यजत्रामधील आणखी एका अभिनेत्याच्या गाडीचा अपघात ! 'हे' ठरलं कारण

Latest Marathi News Live Update : शिंपेगावमध्ये मूकबधिर तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात मोठी कपात जाहीर; नवे दर किती अन् कधी लागू होणार?

SCROLL FOR NEXT