Mumbai Disilva Compound Fire e sakal
मुंबई

मुंबई : डिसिल्व्हा कंपाऊंडमध्ये भीषण आग

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : घाटकोपर येथील असल्फा परिसरातील डिसिल्व्हा कंपाऊंडमध्ये भीषण (Disilva Compound Fire Mumbai) आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आग लवकरच आटोक्यात येईल, अशी माहिती मिळतेय.

डिसिल्व्हा कंपाऊंडमध्ये प्लास्टीकचे गोडाऊन असून त्यालाच ही आग लागल्याची माहिती आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण, शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आजूबाजूच्या परिसरात काळा धूर पसरला आहे. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. ही आग लेव्हल एकची आहे, अशी माहिती मिळतेय.

एका कारखान्याला लागली होती आग -

5 दिवसांपूर्वी 28 डिसेंबर रोजी मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका कारखान्यात भीषण आग लागली होती. या घटनेत बेपत्ता झालेल्या तीनपैकी दोघांचा मृत्यू झाला होता. एक महिला आणि पुरुषाचे मृतदेह सापडले.

लोकल ट्रेनलाही लागली होती आग -

मुंबईत आगीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. ऑक्टोबरमध्ये, मुंबईच्या वाशी स्थानकावर एका लोकल ट्रेनला आग लागली होती. त्यामध्ये कोणीही जखमी झाले होते. त्यावेळी मुंबई ते पनवेल दरम्यानची लोकल सेवा बंद करण्यात आली होती. मुंबईतील अंधेरी येथील एका व्यावसायिक इमारतीलाही ऑक्टोबरमध्ये आग लागली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

AI Use in Ganeshotsav Crowd गणेशोत्‍सवातील गर्दीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी ‘एआय’चा वापर

ED Action: धर्मांतर टोळीचा मास्टरमाइंड चांगूर बाबाला 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात ‘ED’चा दणका!

सरकारचा आदेश निघाला! ५२ हजार २७६ शिक्षकांसाठी मोठा निर्णय, अशंत: अनुदानावरील शाळांना २० टक्के वाढीव टप्पा अनुदान मंजूर, १ ऑगस्टपासून मिळणार अनुदान

Latest Marathi News Updates: निफाड साखर कारखान्याला पिंपळस ग्रामपालिकेडून सील

SCROLL FOR NEXT