Nalasopara Fire News Esakal
मुंबई

Nalasopara Fire News: नालासोपाऱ्यात मध्यरात्रीच्या सुमारास अग्नितांडव; ६ मालवाहू ट्रक जळून खाक, पाहा Video

Nalasopara Fire News: नालासोपाऱ्यात पार्किंगमधील वाहनांना बुधवारी (३१ जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

नालासोपाऱ्यात पार्किंगमधील वाहनांना बुधवारी (३१ जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केलं. यामध्ये ६ मालवाहू ट्रक देखील जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

भीषण आगीच्या या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मालवाहू ट्रक आणि गाड्या जळाल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपाऱ्यातील पाकिंगमध्ये उभ्या असलेल्या एका मालवाहू ट्रकने अचानक पेट घेतला. या ट्रकमध्ये केमिकल असल्याने क्षणार्धात आगीचा भडका उडाला. काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केलं. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इतर वाहनेही यामध्ये पेटली. या आगीमुळे दूरपर्यंत धुराचे लोट पसरले होते.

स्थानिकांनी माहिती देताना सांगितले, आगीच्या भडक्याने एक ते दीड किलोमीटर मीटरच्या अंतरावरील घराच्या काचा फुटल्या. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं असून कुलींगचं काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT