मुंबई

अंबरनाथमध्ये रासायनिक कारखान्यात आग 

सकाळवृत्तसेवा

अंबरनाथ : अंबरनाथ येथील मोरोली औद्योगिक वसाहतीतील "प्रेशिया' या रासायनिक कारखान्यात सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत कारखाना भस्मसात झाला. या घटनेत तेथे काम करणारे चार कामगार जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे कारण समजू शकलेले नाही. 

दुपारी 3च्या सुमारास ही आग लागली, तेव्हा कारखान्यात 13 कामगार होते. वाऱ्यामुळे आगीने काही मिनिटांतच कारखान्याला वेढा घातला. कारखान्यातील रसायने ठेवलेल्या पिंपांचे स्फोट झाल्याने ती आणखीनच भडकली. या स्फोटांचे आवाज दूरवर ऐकू येत होते. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी आलेल्या अंबरनाथ नगरपालिका, एमआयडीसी, उल्हासनगर महापालिका, कल्याण महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आठ बंबांच्या साह्याने ती विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. सायंकाळी 6च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले. दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार जयराज देशमुख, सहायक पोलिस आयुक्त सुनील पाटील, अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार, आनंदनगर औद्योगिक वसाहतीचे (आमा) अध्यक्ष उमेश तायडे आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 

या कारखान्यात सायक्‍लोपेंटालोन नावाचे रसायन बनवले जाते. आग लागल्यानंतर कारखान्यातील कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. आगीचे कारण समजू शकलेले नाही. 
- सुनील पाटील, सहायक पोलिस आयुक्त 

रेल्वेसेवेवर परिणाम 
आगीमुळे उठलेल्या धूराचे लोळ दूरवरून दिसत होते. हा कारखाना लोहमार्गानजीक आहे. या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे वाहतूक एक तास थांबवण्यात आली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कच्च्या तेलाच्या दराचा भडका उडणार, १३५ डॉलरवर पोहोचण्याची भीती; महागाई वाढणार?

Crime: दोन पत्नींपासून १८ मुलांचा बाप; तरीही तिसरीच्या नादी लागला; पण 'त्या' गोष्टीवरून बिनसलं; प्रेयसीनं व्यक्तीला भयंकरपणे संपवलं

PM Modi speech Lok Sabha : होर्मुझमध्ये अडथळा कधीच...; लोकसभेत मोदींनी दिला स्पष्ट इशारा

Horoscope : उद्या बनतोय मंगलधन योग; 'या' 4 राशीच्या लोकांना अचानक मिळतील पैसे, भावकीतला त्रास होणार दूर, एक मोठं काम होणार पूर्ण

Dhule Municipal Corporation : धुळे महापालिकेत लोकशाही आली, पण सत्ता अद्याप लांबच! दोन महिने उलटले तरी समित्यांचा पत्ता नाही

SCROLL FOR NEXT