fire at city centre mumbai central updates
fire at city centre mumbai central updates 
मुंबई

Video:मुंबईत 12 तासांपासून जळतोय मॉल; रात्रभर सुरू होते फायर ऑपरेशन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईत एका मॉलला लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले असून गेल्याजवळपास 12 तासांपासून मॉलमध्ये आगीचे तांडवर सुरू आहे. महापालिकेच्या अग्नीशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नात दोन जवान जखमी झाल्याची माहिती आहे. 

मुंबईच्या इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

24 गाड्या, 16 टँकर
आगा विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या 24 गाड्या आणि पाण्याचे 16 टँकर घटनास्थळी काम करत आहेत. यासाठी अग्नीशमन दलातील अधिकाऱ्यांसह 250 जवान कार्यरत आहेत. सध्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर मोठ्याप्रमाणावर आग पसरली असल्याची माहिती अग्नीशमन दलाकडून देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसरने दिलेल्या माहितीनुसार, आग सुरुवातीला दुसऱ्या मजल्यावरील एका दुकानात लागली होती. त्यानंतर ती दुसऱ्या मजल्यावर आणि तिसऱ्या मजल्यावर पसरत गेली. 

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

दोन जवान जखमी 
मुंबईतील नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलला काल आग लागली होती. ही आग हळू हळू पसरत गेली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आगविझवण्याचे आटोकाट प्रयत्न चालवले आहेत. गेल्या 12 तासांपासून अधिककाळ फायर ऑफरेशन सुरू आहे. यात दोन जवान जखमी झाले आहेत. शामराव बंजारा या जवानाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखळ करण्यात आलं. तर रमेश प्रभाकर चौगुले यांच्या उजव्या हाताला जखम झाल्याने त्यांच्यावरही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. दोघांचीही प्रकृती चांगली असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

रहिवासी सुरक्षितस्थळी 
मॉलला लागलेल्या आगीमुळे शेजारच्या इमारतींमध्ये धुराचे लोट पसरले होते. तेथील रहिवाशांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने दक्षता म्हणून, परिसरातील इमारतींमधील नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 3 हजार 500 नागरिकांना या आगीमुळे सुरक्षितस्थळी हालवण्यात आल्याची माहिती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT