मुंबई

आग विझवता विझवता अग्निशमन अधिकारी कोसळले, दवाखान्यात नेल्यावर समजलं त्यांना तर कोरोनाची लागण...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - काल मुंबईतील अंधेरी भागात आग आग लागली होती. अंधेरी पूर्व येथील आग विझविण्यासाठी गेलेले एक आधिकारी आपले काम करीत असताना अचानक खाली पडले, त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी तपासणीत त्यांना कोरोना झाल्याचे लक्षात आले. एवढेच नव्हे तर त्यांच्या संपर्कातील लोकांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. 

अंधेरी पूर्व येथील नंदधाम इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये गुरुवारी पहाटे आग लागली. खर तर हे आधिकारी प्रकृती ठीक नसल्यामुळे कामावर गेले नव्हते, पण आग लागल्याचे कळताच ते कामावर रुजू झाले. आग लागल्याचा फोन बुधवारी मध्यरात्रीनंतर आला होता.

मरोळ येथलील नंदधाम इंडस्ट्रीयल इस्टेटमधील आग विझवण्यासाठी त्यांनी सहकाऱ्यांसह प्रयत्न सुरु केले. हे काम सुरु असतानाच ते भोवळ येऊन खाली पडले. 

या आधिकाऱ्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून नानावटी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांचा सीटी स्कॅन करण्यात आला. त्यात फुफ्फुसात न्यूमोनियाचे पॅचेस दिसले. पुढील तपासणीत त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्तींबरोबर त्यांच्या ड्रायव्हर तसेच अन्य सहकाऱ्यांस कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले. दरम्यान, मरोळच्या या इंडस्ट्रीयल इस्टेटमधील आग चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर विझवण्यात यश आले.

fire fighter officer collapsed on the floor wile dousing the fire later detected with covid19 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT