मुंबई

#Breaking : तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट; दोघांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क

विरार:  तारापूर एमआयडीसी मधील गॅलेक्सी सरफॅक्टटंट या कंपनीमध्ये सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यामध्ये दोन कामगार दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

तारापूर एमआयडीसीमधील गॅलेक्सी सरफॅक्टटंट कंपनीत झालेल्या स्फोटात विजय पांडुरंग सावंत, समीर शहाबुद्दीन खोजा असे मृत पावलेल्या कामारांगांची नावे आहेत. तसेच रुणाल प्रभाकर राऊत हे जखमी आहेत. कंपनीत सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, त्याचा आवाज सुमारे पाच किमीवर असलेल्या शिवाजी नगर, सालवड, नांदगाव व मुरबे गावांपर्यंत ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले. सध्या लॉकडाउनमुळे कंपनीच्या बाजूच्या बहुतांश कंपन्या बंद असल्याने या स्फोटाचा आवाज जास्त दुरवर ऐकू आला.

तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले असून गंभीर जखमी व संभाव्य मृतांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.दरम्यान, बोईसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Fire at galaxy company in Tarapur MIDC

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT