मुंबई

Navi Mumbai: रहिवाशी साखरझोपेत होते अन्...! नवी मुंबईतील NRI कॉम्प्लेक्सच्या १७ व्या मजल्यावर आग

Narul Latest News: कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील तपास सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Nerul News : नवी मुंबईतील उच्चभ्रू वसाहत म्हणून मानल्या जाणाऱ्या नेरुळ येथील एनआरआय कॉम्प्लेक्सच्या बिल्डिंग क्रमांक ४७ मध्ये सोमवारी(१४ ऑक्टोबर) सकाळी पावणे सहाच्या सुमारास आग लागली.

कॉम्प्लेक्सच्या १७ व्या मजल्यावर आग लागली असल्याने आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि अत्याधुनिक ब्रॉंटो लिफ्ट घटनास्थळी दाखल झाल्याने जलदगतीने आग विझविण्यास मदत झाली.

आगीच्या कचाट्यात सापडलेले घर पूर्णपणे जळून खाक झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ज्या घरात आग लागली होती तिथल्या व्यक्तींनी आग लागल्याचे कळताच तात्काळ तिथून बाहेर पडत अग्निशमन दलाला सूचना दिल्याने मोठी दुर्घटना होण्यापासून टळल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जात आहे. मात्र, आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील तपास सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT