काप आळी येथील मंडळाची गणेशमूर्ती आणताना कार्यकर्ते. 
मुंबई

भिवंडीत बाप्पाच्या आगमनात खड्डेविघ्न

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : गणेशोत्सवाला येत्या २ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे विविध सार्वजनिक उत्सव मंडळांनी देखावे उभे करून कल्याण, पेण, मुंबई येथून मोठ्या गणेशमूर्ती वाजत-गाजत आणण्यास सुरुवात केली आहे. रविवारी सुट्टीचा दिवस साधून अनेक गणेशोत्सव मंडळे आपापल्या मूर्ती आणतात. भिवंडीतील मंडळांनीही रविवारी गणेशमूर्ती वाजत-गाजत उत्सवाच्या ठिकाणी आणल्या. मात्र, शहरातील खड्ड्यांवरून मार्ग काढताना मंडळ कार्यकर्त्यांना मोठी कसरत करावी लागली. 

  कल्याण रोड मार्गावर खराब रस्ता व उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. शहरातील काप आळी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीची वाजत-गाडत मिरवणूक सुरू होती. मात्र, रस्त्यांवरील खड्ड्यांने बाप्पाच्या आगमनात मोठा अडथळा निर्माण झाला. परिणामी वाहतूक कोंडी झाली. अखेर वरिष्ठ पोलिस निरीक्षक ममता डिसोझा यांना याबाबतीत तक्रार जाताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मूर्तीचा मार्ग मोकळा केला. 

  पालिकेने काही ठिकाणी लाखो रुपये खर्च करून ठेकेदारामार्फत खड्ड्यांवर डांबर टाकले. पण मुसळधार पावसात सर्व निकृष्ट डांबर पाण्यात वाहून गेले. ज्येष्ठ नगरसेवक नीलेश चौधरी, गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष मदन भोई यांनी उत्सवापूर्वी तातडीने रस्ते दुरुस्त करावे, अशी मागणी लेखी निवेदन देऊन केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. 

   रविवारी सुट्टीचा दिवस साधत मुंबई येथून घुंगट नगर, संयुक्त मित्र मंडळ गौरीपाडा व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काप आळी यांनी कल्याणरोड येथील रस्त्यावर पडलेले खड्डे चुकवत आपल्या गणेशमूर्ती वाजत-गाजत आणल्या. मात्र, खराब रस्त्यांमुळे इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी सुमारे दोन ते चार तास लागले. यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागला. यासाठी पालिकेने तातडीने उपाययोजना करून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांनी महापौर जावेद दळवी, पोलिस आयुक्त राजकुमार शिंदे यांची भेट घेऊन केली आहे.

 गणेशोत्सवापूर्वी खराब झालेले रस्ते व खड्डे भरण्याचे निर्देश प्रभाग अधिकारी व बांधकाम अभियंता यांना देण्यात आले आहेत. पावसामुळे कामात अडथळा निर्माण होत आहे. तरीसुद्धा रस्ते दुरुस्ती 
केले जातील.
- जावेद दळवी, महापौर, भिवंडी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : ११ षटकार, ९ चौकार... पुण्यात ३९ चेंडूंत शतक ठोकणाऱ्या फलंदाजाचे SRH कडून पदार्पण, कोण आहे Salil Arora?

Akola News : ‘ई-गव्हर्नन्स’मध्ये अकोला एसपी कार्यालयाला तृतीय क्रमांक; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते एसपी अर्चित चांडक यांचा गौरव

Pune News: हॉटेल मालकांनो सावधान! गॅस टंचाईच्या नावाखाली जादा पैसे घेणं पडणार महागात; 'सीसीपीए'ने काढला कारवाईचा बडगा.

महिलेनं थेट मुख्यमंत्र्यांना आलिंगन देत गालावर KISS केलं, रॅलीतला VIDEO VIRAL

RCB vs SRH Live : रजत पाटीदारने टॉस जिंकला, दोन नव्या चेहऱ्यांना दिली संधी; कोण आहे Abhinandan Singh?

SCROLL FOR NEXT