MLA Prakash Surve office Sakal Media
मुंबई

शिवसेना आमदाराच्या कार्यालयाबाहेरील 'त्या' गाडीत स्फोटकं नव्हे फटाके!

सुरुवातीला स्फोटकांची गाडी सापडल्याच्या अफवेने उडाली होती खळबळ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेचे मुंबईतील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर स्फोटकांची गाडी सापडल्याची अफवा असल्याचं उघड झालं आहे. स्वांतत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अशी स्फोटकांची गाडी सापडल्याची चर्चा सुरु झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. पण पोलिसांच्या तपासानंतर त्या गाडीत फटाके असल्याचं समोर आल्यानं या चर्चेवर पडदा पडला.

मुंबई उपनगर येथील मागठाणेचे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर एक अज्ञात गाडी गेल्या चार पाच दिवसांपासून उभी होती. याबाबत माध्यमांशी बोलताना स्वतः आमदार सुर्वे यांनी सांगितलं होतं की, "माझ्या कार्यालयाबाहेर नुसती गाडी सापडली नाही तर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली आहे. उद्याच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्यामागे कोणाचा हात आहे याची चौकशी व्हावी."

मात्र, याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी गाडीची कसून तपासणी केली. या तपासणीत या गाडीत फटाके आणि काही कागदी बॉक्समध्ये कचरा आणि भंगार असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर स्फोटकांची गाडी सापडली ही अफवा असल्याचं सिद्ध झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT