First Accident on MTHL video goes viral speeding car overturned mumbai trans harbour link accident News  
मुंबई

First Accident on MTHL : देशातील सर्वात लांब सागरी पुल 'अटल सेतू'वर पहिला अपघात; पाहा Viral Video

देशाच्या आर्थिक राजधानीत नव्याने बांधण्यात आलेल्या अटल सेतू पुलावर रविवारी भीषण अपघात झाला.

रोहित कणसे

First Accident on MTHL : देशाच्या आर्थिक राजधानीत नव्याने बांधण्यात आलेल्या अटल सेतू पुलावर रविवारी भीषण अपघात झाला. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) म्हणून ओळखल्या जाणार्‍या या हायवेचे 15 दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केल्यानंतर हा पहिलाच मोठा अपघात आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघाताचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल. दुसऱ्या कारच्या डॅशबोर्डवर बसवलेल्या कॅमेऱ्यात मागून येणारी कार नियंत्रणाबाहेर जाते आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगला आदळते दिसून येत आहे.

देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतू असलेल्या या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर झालेल्या पहिल्या अपघाताच्या व्हिडिओ ची सगळीकडे चर्चा होत आहे . या व्हिडिओमध्ये लाल रंगाची कार रस्त्यावर उलटताना दिसत आहे. हा संपूर्ण व्हिडीओ मागे बसलेल्या कारमध्ये बसवलेल्या डॅश कॅममध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ रविवारी दुपारी 2.50 च्या सुमारास आहे. MTHL वर लाल रंगाची कार अनेक वेळा पलटी खाताना दिसत आहे . या अपघातात दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कार खूप वेगाने येत होती. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचा नियंत्रण सुटले, त्यामुळे मोठा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

MTHL मुंबई येथे असून यात सहा लेन आहेत, तसेच याची लांबी 22 किलोमीटर लांबीचे आहे. याच वर्षी 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले . हा पूल मुंबईला नवी मुंबईशी जोडतो. पुलाच्या बांधकामामुळे लोकांचा सुमारे तासाभराचा वेळ वाचत आहे. या पुलाला अटल सेतू असेही म्हणतात.

MTHL च्या सुरक्षेसाठी AI ने सुसज्ज 400 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पुलावर कोणतेही वाहन बंद पडल्यास किंवा कोणी संशयास्पद व्यक्ती दिसल्यास हे कॅमेरे तात्काळ नियंत्रण कक्षाला माहिती देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT