Thief
Thief Sakal
मुंबई

चोरीचा पहिलाच प्रयत्न; तोपण फसला

शर्मिला वाळुंज

नशेत धुंद होत रस्त्यावरुन झिंगत चालणाऱ्या एका व्यक्तीला हेरुन त्याला धक्का बुक्की करत दोघा चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना रविवारी रात्री घडली.

डोंबिवली - नशेत धुंद होत रस्त्यावरुन झिंगत चालणाऱ्या एका व्यक्तीला हेरुन त्याला धक्का बुक्की (Beating) करत दोघा चोरट्यांनी (Thief) त्याच्याकडील मोबाईल (Mobile) हिसकावून पळ काढल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासातच रामनगर पोलिसांनी (Police) तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोघांना अटक (Arrested) केली आहे. सुदर्शन पटेल (वय 18) व अमित वागरे (वय 18) अशी अटक आरोपींची नावे असून त्यांचा हा चोरीचा पहिलाच प्रयत्न होता. मात्र अवघ्या काही तासातच या नवख्या चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

डोंबिवली पूर्वेतील मढवी स्कूल परिसरात राहणारे सुदेश आमकर (वय 47) हे रविवारी रात्री ते राजाजी पथ रोडवरुन घरी जात होते. नशेत ते रस्त्याने झिंगत जात असतानाच दोघा चोरट्यांनी ते पाहीले आणि संधीचा फायदा घेत त्यांनी त्या गृहस्थांना अडवून त्यांना दमदाटी करत त्यांच्याकडील 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन पळ काढला.

याप्रकरणी फिर्यादी यांनी सोमवारी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिस उपनिरिक्षक संदिप शिंगटे यांनी तातडीने सुत्र हलवित परिसरातील सीसीटिव्ही चेक करत त्याआधारे चोरट्यांना अवघ्या काही तासातच डोंबिवलीतून अटक केली. आपसात संगनमत करुन त्यांनी ही चोरी केल्याचे कबुल केले असून त्यांनी चोरलेला मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

हे दोघेही चोरटे नवखे असून त्यांची ही पहिलीच चोरी होती. यापूर्वी त्यांनी किरकोळ मारामारी, दमदाटी करणे असे गुन्हे केलेले असल्याचे तपासाच उघड झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT