Co-operative Housing Societies Conference best housing cooperative society award 2023
Co-operative Housing Societies Conference best housing cooperative society award 2023 sakal
मुंबई

Mumbai : सहकारी गृहनिर्माण संस्थांची पहिली परिषद मुंबईत संपन्न

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दि मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हौसिंग फेडरेशन लि. आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थाची परिषद मुंबईतील नेस्को सेंटर गोरेगाव इथे संपन्न झाली.

या परिषदेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले तर समारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण सहकारी संस्था पुरस्कार - २०२३चे वितरणही करण्यात आले.

राज्य सरकार आणि गृहनिर्माण संबंधित विविध प्राधिकरणांचे अधिकाऱ्यांनी परिषदेत उपस्थिती दर्शविली. पहिल्या सत्रात परिषदेचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी राज्य शासनाकडून इमारतींचा रखडलेल्या पुनर्विकास आणि स्वयं पुनर्विकास करू इच्छिणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना दिलासा देणारे निर्णय जाहीर केले.

परिषदेच्या दुसऱ्या सत्रात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर त्या त्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली.

मुंबईत दीड लाखांहून अधिक सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत.महसूल विभागाच्या जागाही आहेत. आम्हाला शासनाचे पैसे आम्हाला एक भूखंड द्या आम्ही तिथे एक सहकार भवन उभारतो अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी महसूल मंत्र्यांकडे केली.

यावर बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सहकार चळवळीचे आपण सर्व पाठीराखे आहोत. हे भवन उभे करण्यासाठी आम्ही राज्य शासनाच्यावतीने भूखंड देण्याची कार्यवाही करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

तसेच, प्रतिनिधींच्या इतर प्रश्नांवर उत्तरे दिली. 'स्वयंपुनर्विकास प्रक्रिया व अमलबजावणी' याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. व शेवटच्या समारोप सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले तसेच यावेळी गृहनिर्माण संस्थांच्या पुरस्काराचे वितरणही करण्यात आले.

ढिसाळ व्यवस्थापन

पहिल्या सत्रानंतर उपस्थित सभासद आणि मान्यवरांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र यावेळी उपस्थितांची आकडेवारीचा अंदाज न आल्याने भोजन व्यवस्था अपुरी पडली. तर सर्वत्र जेवलेल्या थाळ्यांचा आणि पाण्याच्या बाटल्यांचा खच पडला होता. ओरड झाल्यानंतर आयोजकांकडून भोजन व्यवस्थेत बदल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

Latest Marathi News Live Update : 'भाजप उमेदवार म्हणतायत संविधान बदलू, मात्र मोदी..'; काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

SCROLL FOR NEXT