corona
corona  
मुंबई

बाप रे!  आता 'इथेही' कोरोनाचा शिरकाव..नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत सर्वत्र हाहाकार माजवला आहे. मुंबईतल्या प्रत्येक भागात कोरोनाचे रुग्ण आहेत. मात्र आता कोरोनाचा संसर्ग मुंबई जवळच्या तालुक्यांमध्ये पसरायला सुरुवात झाली आहे. अशाच एका तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. 

सुधागड हा तालुका कोरोनाच्या संसर्गापासून आतापर्यंत सुरक्षित होता. मात्र सुधागड तालुक्यात अखेर कोरोनानं शिरकाव केला आहे. रविवारी रात्री तालुक्यातल्या नागशेत इथल्या एका ६२ वर्षीय व्यक्तीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परिणामी संपूर्ण तालुक्यात भीतीचं  वातावरण निर्माण झालं आहे.  त्यामुळे येणारे तीन दिवस पाली बाजारपेठ बंद राहणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. 

हेही वाचा: तासाभरात करता येणार कोरोनाचं निदान; सर्वसामान्यांना परवडणाऱ्या टेस्टची निर्मिती.. 
 
प्रशासनानं तातडीनं पावलं उचलत नागशेत परिसर कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. हा रुग्ण काही दिवसांपूर्वी मुंबईतून नागशेत इथे गावी आला होता. त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यामुळे प्रशासनानं त्यांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना वावळोली इथल्या कोव्हिड-19 सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवले होते.

त्यानंतर त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांच्या नमुन्यांचा अहवाल काही दिवसांनी प्राप्त झाला.  त्यामध्ये संबंधित व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईतल्या जे जे रुग्णालयात आणण्यात आलं आहे. 

दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सरकारचे नियम व सूचनांचे पालन करावे आणि अधिक खबरदारी घ्यावी असं आवाहन पाली-सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी नागरिकांना केलंय. 
first corona patient found in sudhagarh read full story  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT