मुंबई

मृत्यूदर नियंत्रणासाठी 'ही' सुविधा ठरणार अत्यंत फायदेशीर, राज्यातील पहिला टेलीआयसीयु प्रकल्प भिवंडीत

भाग्यश्री भुवड

मुंबई  : भिवंडीच्या उपजिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिल्या टेली-आयसीयु प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. अतिदक्षता विभागात (आयसीयु) दाखल असलेल्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा या तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येणार आहे. राज्यात अकोला, जळगाव, सोलापूर, जालना आणि औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा लवकरच कार्यान्वित होणार आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर नियंत्रणासाठी टेलीआयसीयु सुविधा फायदेशीर ठरेल, असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

दिल्लीतील विशेषद्य ठेवणार लक्ष-

मेडीस्केप इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उत्तर दायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून प्रायोगिक तत्वावर ही सुविधा काही महिने देण्यात येणार आहे. भिवंडीच्या आयजीएम उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयुमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून दिल्ली येथील विशेषज्ञांकडून गंभीर रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाते आणि त्यांना कुठले उपचार द्यायचे याचे मार्गदर्शन केले जाते. 

पहिल्यांदाच भिवंडीत सेवा -

दिवसातून पाच वेळा या विशेषज्ञांकडून रुग्णांची विचारपूस केली जाते. राज्यात अन्य ठिकाणी करण्यात येणारी ही सुविधा वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात आहे. मात्र भिवंडी त्याला अपवाद ठरले असून ही सुविधा असणारे ते राज्यातील पहिले उपजिल्हा रुग्णालय ठरले आहे. येथील टेलीआयसीयु कक्ष आरोग्यमंत्री यांच्या दिवंगत मातोश्री शारदाताई यांना समर्पित करण्यात आल्याचे मेडीस्केप फाऊंडेशनतर्फे सांगण्यात आले.

आरोग्यमंत्री म्हणाले, आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब असून मृत्यूदर एक टक्क्यांपेक्षाही कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात विशेषज्ञांची जाणवणारी कमतरता टेलीआयसीयु तंत्रज्ञानामुळे काहीशी भरून निघणार असून कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर विशेषज्ञांच्या मार्गदर्शनातून उपचार झाले तर मृत्यूदर कमी होण्यासाठी त्याचा लाभ होईल. जालना, सोलापूर, औरंगाबाद येथील रुग्णालयात ही सुविधा पुढील आठवड्यात कार्यान्वित होऊ शकते.

( संपादन - सुमित बागुल  )

first ever tele ICU project starts in bhiwandi thane it will help to reduce covid death rate

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident : जिवलग मित्रांचे स्वप्न भंगले! आर्मी भरतीची परीक्षा देऊन येताना दोन तरुणांचा ट्रक-दुचाकी अपघातात मृत्यू

Rajgad Leopard : राजगडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शेतकरी भयभीत; शेतकामासाठी मजूर मिळेनात!

Latest Marathi Breaking News Live : युती झाली नाही तर मैत्रीपूर्ण लढत करु- दीपक केसरकर

Kopargaon Accident:'वाहन चालकाचा होरपळून मृत्यू'; आराम बस आणि चारचाकीचा भीषण अपघात, मनमाड महामार्गावरवरील घटना..

Pimpri Crime : मोबाईल उचलला नाही म्हणून पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न; तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा नोंदवला!

SCROLL FOR NEXT