मुंबई

वाढीव वीजबिलांवर आज होणार निर्णय ? सर्वसामान्यांना आज बाप्पा पावणार ?

सुमित बागुल

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात अनेकांना अव्वाच्या सव्वा बिलं पाठवण्यात आली आहेत असा आरोप होतोय. सरासरी प्रमाणे पाठवलेली मोठाली वीजबिले आल्याने अनेकांची दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती झालीये. दरम्यान आज तरी वाढीव वीजबिलांवर तोडगा निघतो का हे पाहणं आज महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आज दुपारी तीन वाजता महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत आज तरी वाढीव वीज बिलांवर चर्चा होतेय का आणि या प्रकरणी तोडगा निघणार का असा प्रश्न आता विचारला जातोय. 

सरकारकडून याबाबत माहिती देण्यात येतेय की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतची चर्चा होणार आहे. वाढीव वीजबिलांचा प्रस्ताव तयार झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत वीजबिलांवर दिलासा दिला जाऊ शकतो का याबाबत चर्चा केली जाणार होती. दरम्यान या प्रस्तावावर अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र आता प्रस्ताव तयार असल्याने आणि आज मंत्रिमंडळ बैठक पार पडत असल्याने आज तरी या विषयवार कॅबिनेटमध्ये चर्चा होतेय का हे पाहावं लागेल. 

आज होणारी गणपतीच्या काळातील पहिली कॅबिनेट मिटिंग आहे. त्यामुळे आज तरी वाढीव वीजबिलांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी आणि नागरिकांना दिलासा मिळावा अशी मागणी सर्वच स्तरातून केली जातेय. 

सरकारकडून वारंवार सांगण्यात येतंय की याबाबतचा प्रस्ताव तयार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णयांनी घेऊ. त्यामुळे आता प्रस्तावानंतरची आजची ही पहिली मंत्रिमंडळ बैठक आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होतेय का आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.  

first state cabinet meeting in ganesh utsav discussion on excessive electricity bill might be taken

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: ट्रेन समोर… तरीही थांबले नाहीत! मुलुंड स्टेशनवर ट्रॅकवरच सुरू ‘फिल्मी’ मारामारी, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

एकता कपूर यांनी त्यांच्या कथांना महिला सशक्तीकरणाचे माध्यम असल्याचे सांगितले, मांडला आपला दृष्टिकोन

Australia Cricket Contract: ऑस्ट्रेलियाच्या करारात २१ खेळाडूंनाच स्थान; मॅक्सवेलसह नामांकित खेळाडूंना वगळलं; पाहा संपूर्ण यादी

Stock Market Today: ट्रम्पच्या भूमिकेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी! Indigo चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'ओडिशा स्थापना दिना'निमित्त दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT