बोर्डी ः गेल्या महिन्यापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बोर्डी, घोलवड, झाई परिसरातील बोटी किनाऱ्यावरच आहेत.  
मुंबई

मच्छीमार समस्यांच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

बोर्डी ः डहाणू परिसरात गेल्या महिन्यापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बोर्डी, घोलवड, झाई परिसरातील माच्छी, मांगेला आदिवासी समाजातील मच्छीमारांवर बेकारीचे संकट कोसळले आहे. पावसामुळे बोटी समुद्रात उतरवणे धोकादायक असल्याने त्या किनाऱ्यावरच असल्याने मच्छीमारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. 

झाईच्या बंदरावर सुमारे ९० मोठ्या, ३५ लहान मिळून १३५ नौका मच्छीमारी करण्यासाठी सज्ज आहेत. या व्यवसायावर सुमारे ४०० कुटुंब उदरनिर्वाह करतात. याव्यतिरिक्त मच्छीमारीसाठी खलाशांची संख्या प्रत्येक बोटीत पाच मिळून याप्रमाणे सुमारे साडेचारशे आहे. तेही या व्यवसायावर अवलंबून असतात; मात्र सततच्या पावसामुळे समुद्रात मच्छीमारीसाठी उतरणे धोकादायक झाले आहे. मासेमारी बंद पडल्यामुळे मच्छीमार व खलाशी मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. 

बाजारात माशांची आवकही घटली आहे. या भागात गणेशोत्सवानंतर बोंबील, कोळंबी, पापलेटची खोल आणि उथळ पाण्यात मासेमारी केली जाते. यासाठी बोट मालकांनी जाळी, डिझेल, धान्यसाठा तसेच मजुरांना आगाऊ रक्कम देऊन तीन दिवसांच्या एका फेरीच्या मच्छीमारीसाठी एका नौकेसाठी किमान १० हजार यानुसार १२६ नौकांसाठी लाखो रुपयाची गुंतवणूक केली आहे.

गणेशोत्सवानंतर मासेमारी करून मिळालेल्या उत्पन्नातून पैसे वसूल होतील, या आशेने नारळी पौर्णिमेला सागर पूजन आणि सात दिवस गणरायाची मनोभावे पूजा करून येथील मच्छीमार समुद्रात मासेमारी करण्यासाठी सज्ज झाला होता; मात्र पावसाने त्याच्या उमेदीवर पाणी फिरवले आहे.

झाईच्या बंदरातील काही नौका मुंबई, रत्नागिरी तसेच पोरबंदरच्या समुद्रात मासेमारीसाठी जातात. उर्वरित बोटी झाई बंदरातूनच मासेमारी करतात; मात्र यंदा पावसामुळे महिनाभर मच्छीमार बोटी, मालक, खलाशी बसून आहेत. 
राजेश मजवेलकर, मच्छिमार

माशांचे भाव वधारले
गणेशोत्सवानंतर माशांची मागणी वाढली असून आवक घटल्याने बाजार भाव कडाडले आहेत. बोंबील शंभर रुपयांना आठ, पापलेट हजार रुपये किलो भावाने विकले जात आहे. कोळंबी अल्प प्रमाणात येत असल्यामुळे ५०-१०० रुपयांना वाटा विकला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT