मुंबई

कोरोनामुळे भुरटे चोर बेलगाम; कारागृहातून पेरॉलवर बाहेर आलेल्यांचा पुन्हा हौदोस

राजु इनामदार


अंधेरी :- घोरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या सराईत चोरट्यांना कोरोनाच्या कारणास्तव ऑर्थररोड कारागृहातून पेरॉलवर सोडून देण्यात आले होते. मात्र, बाहेर आल्यानंतरही गुन्हेगारांनी पुन्हा घरफोडी करून हैदोस घातला. त्यामुळे कुरार व्हिलेज पोलिसांनी हैदोस घालणाऱ्या या पाच सराईत गुन्हेगारांना पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत.  मोहसीन मोहम्मद हनिफ शेख, प्रदीप यादव, कृष्णा राणा, शुभम बामणे आणि गणेश काऊंडर अशी आरोपींची नावे आहेत. 

29 जुलै रोजी कुरार पोलिसांचे विशेष पथक गस्तीवर असताना त्यांनी चोरीच्या बाईकसह दोघांना अटक केली. त्यांच्या अधिक चौकशीत दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले. झोपडपट्टी परिसरातून कोरोना काळात बहुतांश परप्रांतीय आपापल्या मूळ गावी निघून गेले होते. त्यांच्या बंद घरांची रेकी करून ही पाचजनांची टोळी घरफोडी करीत होती. आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने आणखी तिघांना अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांनी 9 गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या एक लॅपटॉप, चार मोबाईल, एक बाईक आणि सोन्याचे दागिने असा साडेपाच लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

आरोपी मोहसीन विरुद्ध आंबोली, कुरार पोलीस ठाण्यात 7 गुन्ह्याची नोंद आहे. कृष्णा राणा याच्या विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात आणि वर्सोवा पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. तर, शुभम याच्या विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात चार गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी दिली. 

कोरोनामुळे भुरटे चोर बेलगाम 
सध्या मुंबईतून लाखो परप्रांतीय आपल्या मूळगावी गेले आहेत. त्यामुळे झोपडपट्टी परिसरात अनेक घरांना टाळे लागलेले आहे. त्यामुळे दिवसा रेकी करून हे पाचही आरोपी रात्री घरफोड्या करीत होते, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. दरम्यान, कोरोनामुळे कारागृहात बंदिस्त कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकारने कैद्यांना पेरॉलवर सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, भुरटे चोर याचा गैरफायदा घेत असल्याचेही या प्रकरणावरून समोर येत आहे.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT