मुंबई

अल्पवयीन मुलीला वेश्‍याव्यवसायात ढकलणाऱ्यांस अटक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अल्पवयीन मुलीचे लग्न लावून नंतर तिला देहविक्री व्यवसायात ढकलल्याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यात मुलीची आई, पती व भाऊ, पीडित मुलीला देहविक्री करण्यास भाग पाडणारी दलाल महिला व तिच्या पतीचा समावेश आहे. 

पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने एका व्यक्तीशी तिचे लग्न लावून दिले. पतीने पीडित मुलीला वारंवार मारहाण करत तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. त्यामुळे ही मुलगी माहेरी येऊन राहिल्यानंतर आईनेच तिला देहविक्रीसाठी परिसरातील एका महिलेच्या स्वाधीन केले. तिने 50 ते 60 व्यक्तींसोबत तिला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

या दलाल महिलेच्या पतीनेही तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार या मुलीने केली आहे. या तक्रारीनंतर संबंधितांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पाचही जणांना अटक करण्यात आली आहे. मुलीवर अत्याचार करणाऱ्या 50 ते 60 व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

SCROLL FOR NEXT