Tobacco free school
Tobacco free school sakal media
मुंबई

ठाणे जिल्ह्यातील ५९७ शाळा तंबाखू मुक्त; जिल्हा प्रशासनाची माहिती

राहुल क्षीरसागर

ठाणे : शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ (Tobacco) विकण्यास बंदी आहे. मात्र, तरी देखील याला हरताळ फासत काही ठिकाणी विक्री होत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे राज्य सरकारच्या (Maharashtra Government) शालेय शिक्षण व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सलाम फाउंडेशन, मुंबई यांच्या सहकार्यातून ‘तंबाखू मुक्त शाळा’ (Tobacco free school) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमातून ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ठाणे जिल्हा परिषदेच्या ५९७ शाळा (Thane zp schools) या तंबाखू मुक्त झाल्या आहेत. यापैकी अंबरनाथ आणि भिवंडी तालुक्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त झाल्या असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

तंबाखूसारख्या व्यसनानी समाजाला ग्रासले आहे. तंबाखूमुळे कर्करोग होतो, तसेच इतर गंभीर आजार देखील बळावतात. त्यामुळे देशाची भावी पिढी या व्यसनापासून दूर राहावी म्हणून शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांची जागृती करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून शाळा व शाळा परिसर हा ‘तंबाखू मुक्त शाळा’ म्हणून ओळखला जावा या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेच्या आवारात जनजागृतीचे फलक लावण्यात येत आहे. तसेच ज्या शाळा तंबाखूमुक्तीचे ११ निकष पूर्ण करतील, अशा शाळा या तंबाखू मुक्त म्हणून घोषित करण्यात येत असतात.

ठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एक हजार ३२८ शाळा आहेत. त्यापैकी ८७१ शाळांची नोंद सलाम मुंबई फाऊंडेशन ॲपवर झाली आहे. तसेच आत्तापर्यंत जिल्ह्यातील ५९७ शाळांनी तंबाखू मुक्तीचे ११ निकष पूर्ण केले असून या शाळा तंबाखू मुक्त म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील अंबरनाथ आणि भिवंडी तालुक्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त झाल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला आहे.

शिक्षकांचा सन्मान

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि भिवंडी या दोन्ही तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा या तंबाखू मुक्त झाल्या आहेत. या शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली असून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून त्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, जिल्हा दंतचिकित्सक डॉ. अर्चना पवार, उपशिक्षणाधिकारी ललिता दहितुले आदी उपस्थित होते.

तंबाखू मुक्तीच्या उपक्रमात शिक्षण विभागाचा खूप मोठा वाटा आहे. जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. इतर तालुक्यांतील शाळा देखील लवकरच तंबाखू मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

- डॉ. अर्चना पवार, जिल्हा दंतचिकित्सक, ठाणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT