mumbai local file photo
मुंबई

मुंबई लोकलमधील प्रवासी पाच लाखाने घटले

स्थानकावर फक्त लोकलच्या भोंग्याचा आवाज

सकाळ वृत्तसेवा, कुलदीप घायवट

मुंबई: 'ब्रेक द चेन' निर्बंध लागू केल्यानंतर लोकलमध्ये अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना प्रवास करण्यास परवागनी देण्यात आली. त्यामुळे मागील दोन दिवसांत लोकलमधील प्रवासी संख्या घटली आहे. तर, स्थानकावर शासकीय कर्मचाऱ्यांची तुरळक गर्दी दिसून येत असल्याचे चित्र तयार झाले आहे. संचारबंदीच्या काळात उपनगरीय लोकलमधील प्रवाशांची संख्या एप्रिल महिन्याच्या दोन आठवड्याच्या तुलनेत सुमारे 5 लाखांनी कमी झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील 2 लाख 65 हजार, तर मध्य रेल्वे मार्गावर सुमारे 2 लाखांनी प्रवासी संख्या कमी झाली आहे.

कोरोनाची तीव्रता वाढत असल्याने राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊन जाहिर केला होता. यावेळी कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, यामध्ये लोकल प्रवासाबाबत कोणतेही कडक निर्बंध लावण्यात आले नव्हते. ठराविक वेळेत सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्याची मुभा दिली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी खासगी क्षेत्रातील कंपन्यांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याचे सूचना दिल्या होत्या. यासह कोरोनाशी संबंधित नसलेल्या शासकीय कार्यालयातील विभागाना 50 टक्के उपस्थिती कमी करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी प्रवाशांची गर्दी रोडावल्याचे चित्र होते. मार्च महिन्यांच्या तुलनेत एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम रेल्वे मार्गावरील सुमारे 2 लाख 31 हजार आणि मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी संख्या 3 लाखांने कमी झाली होती. पश्चिम रेल्वे मार्गावरील एका आठवड्याच्या तुलनेत 2 लाख 65 हजाराने कमी झाली आहे. तर, मध्य रेल्वे मार्गावरील 2 लाखांनी कमी झाली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवासी संख्या

गुरूवारी, 8 एप्रिल 2021 - 14, 59, 931

गुरुवारी, 15 एप्रिल 2021 - 11, 86 227

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी संख्या

गुरूवारी, 8 एप्रिल 2021 - 19 लाख

गुरुवारी, 15 एप्रिल 2021 - 17 लाख

स्थानकावर फक्त लोकलच्या भोंग्याचा आवाज

नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना 'ब्रेक द चेन' निर्बंधाचे पालन करण्याचे, नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार लोकलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करताना दिसून येत आहेत. सकाळी आणि सायंकाळच्यावेळी प्रवाशांची वर्दळ दिसून येते. मात्र, दुपारी आणि रात्रीच्या सुमारास स्थानकावर फक्त लोकलचे भोंगे आणि उद्घोषणेचा आवाज कानावर पडतो. स्थानकातील जिने, सरकते जिने, तिकिट खिडक्या, स्वच्छतागृहे रिकामे दिसून येत आहेत. अनेक स्थानकावर सुरक्षा व्यवस्थेचा पहारा असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माशी शिंकली…! IPL 2026 ला सुरुवात होण्यापूर्वीच CSK च्या स्टार खेळाडूने माघार घेतली, दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार

Mokhada News : थायलंडच्या सफेद जांभळाची चव आता मोखाड्यात... उच्च शिक्षित डॉ. सुमित ढाक या तरुणाचा अभिनव शेती प्रकल्प.

Latest Marathi News Live Update : दादर येथील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा

Phulambri News : फुलंब्रीत गोवंश कत्तलीचा मोठा पर्दाफाश...पोलिसांचा छापा; आठ जनावरे जिवंत ताब्यात

Gold Rate Update : गुढीपाडव्याला महाराष्ट्रात सोनं कोसळलं! 2 महिन्यांतील सर्वात स्वस्त भाव आज; 1 तोळा कितीला विकलं जात आहे?

SCROLL FOR NEXT