मुंबई

भीषण ! महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली; ७० ते ८० रहिवासी ढिगाऱ्यात अडकल्याची भीती

सुमित बागुल

रायगड - रायगडमधील महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. महाडमधील काजळपुरा परिसरातील ही इमारत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तारिक गार्डन असं या इमारतीचे नाव आहे. या इमारतीत ४७ फ्लॅट्स असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेनंतर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची माहिती समोर येतेय. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सध्या तब्बल ७० ते ८० रहिवासी अडकल्याची माहिती आहे.  

साधारण सहा ते सव्वा सहा वाजता ही इमारत कोसळल्याण्याची दुर्घटना घडलीये. सदर इमारत ही केवळ आठ ते दहा वर्ष जुनी असल्याचं समजतंय. या दुर्घटनेवेळी इमारतीमधून २५ नागरिक बाहेर पडल्याचंही समजतंय. दरम्यान रॅक्यू ऑपरेशनमध्ये तब्बल १५ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आल्याचं समजतंय. या व्यतिरिक्त आणखी ७० ते ८० रहिवासी या ढिगाऱ्यात अडकल्याची माहिती समोर येतेय. 

सध्या या इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेश सुरु आहे. घटनास्थळी ४ रेस्क्यु टीम्स कार्यरत आहेत 

( बातमी अपडेट होतेय )

five storied building collapsed in mahad eighty people seems to be trapped in derbies

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT