Accident News Esakal
मुंबई

Accident News: प्ले झोनमध्ये मुलांना एकटं सोडू नका! डोंबिवलीत खेळण्यात डोकं अडकल्यानं पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू

डोंबिवलीच्या मानपाडा परिसरात प्ले झोनमध्ये खेळत असताना खाली पडून पाच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

डोबिंवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीच्या मानपाडा परिसरात प्ले झोनमध्ये खेळत असताना खाली पडून पाच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. परिसरातील हायप्रोफाईल रिजेन्सी अनंतम कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊसमध्ये ही घटना घडली आहे. सक्षम उंडे असे या चिमुकल्याचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.(Latest Marathi News)

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडे मानपाडा परिसरातील रीजन्सी अनंत या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये भरत उंडे यांचा पाच वर्षाचा मुलगा सक्षम सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊसमधील प्लेझोन मध्ये खेळण्यासाठी गेला होता.

यावेळी खेळत असताना तो अचानक खाली पडला. जवळच काम करणाऱ्या कामगारांचे सक्षमकडे लक्ष गेल्याने त्यांनी सक्षमला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. (Marathi Tajya Batmya)

तर भरत उंडे यांचा सक्षम हा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT