मुंबई

हृदयद्रावक! फुलेविक्रेत्यांचे आयुष्य कोमजले; दैनंदिन गरजांसाठीही पैसे नाहीत

सकाळ वृत्तसेवा


वाशी : सरकारने चौथ्या टाळेबंदीत अनेक व्यवसायाला परवानगी दिली आहे. मात्र, फूल विक्रेत्यांना परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे पुष्पहार, फूल विक्रते, पुष्पगुच्छ बनवणाऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. दुकाने बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

शहरातील धार्मिक स्थळे बंद असल्याने पुष्पहार विक्रेत्यांकडे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठीही पैसे नाहीत.  ऐरोलीतील दत्त मंदीर, सानपाडा येथील शंकराचे मंदीर, दिघा येथील साईबाबा मंदीर, आदी मंदिरासमोर फुल विक्रेते बसत होते. शहरात नियमित वाढदिवस, लग्नसमारंभ, देव पूजा, कार्यशाळा, शिबिरे तसेच हॉटेलमध्ये कायमच फुलांना मागणी असते. मात्र लॉकडाउनमुळे मोठा अर्थिक फटका विक्रेत्यांना बसला आहे. शहरात सुमारे ३०० च्या सुमारास पुष्पहार विक्रेत्यांची दुकाने आहेत. याशिवाय शहरात शेकडो फूल विक्रेते आहेत. मात्र टाळेबंदीमुळे त्यांच्यावर दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे. गेल्या दोन महिन्यापासून कोरोनामुळे दुकाने बंद ठेवण्यात आले आहे. दुकानामध्ये सात ते आठ जण काम करुन उदारनिर्वाह करत होतो. मात्र आता कामच थांबल्यामुळे काय करावे असा प्रश्न पडला आहे. तर पैसे देखील संपत आल्यामुळे आता कसे जगावे असा प्रश्न पडल्याचे फुल विक्रेता सुरेंद्र शर्मा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

FDA Crime : मंचर बनावटदूध भेसळ प्रकरण; तीन आरोपींच्या घरांची झडती, लॅपटॉप, कागदपत्रे केली जप्त

Shivneri Fort Landslide : किल्ले शिवनेरी येथे शिवाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे वाहून आला मातीचा ढिगारा

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

IND vs ENG 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला! ज्याच्यामुळे मागची मॅच हरली, त्याला केले संघाबाहेर; बघा कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT