मुंबई

आता समजणार किती जणांना कोरोना होऊन गेलाय, कारण आता होणार 'ही' अत्यंत महत्त्वाची टेस्ट...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : देशभरातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल होत असला तरी कोरोना विषाणूचा प्रसार मात्र वाढताना दिसत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. हे पाहता, चाचणी क्षमता जास्तीत जास्त वाढवण्याचा निर्णय भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने घेतला आहे.

कोरोनासाठी अधिकतर आरटी-पीसीआर निदान चाचणी केली जाते. मात्र या चाचणीमध्ये व्यापक उपलब्धतेच्या मर्यादा आहेत. त्यामुळे विश्वसनीय आणि सोयीस्कर जलद निदान करणारी उपकरण विकसित करणे आवश्यक आहे. अशा उपकरणांचा वापर सर्व संभाव्य सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सेवांमध्ये संभाव्य निदान चाचण्या म्हणून केला जाऊ शकेल आणि मोठ्या प्रमाणावर चाचणीसाठी उपलब्ध होईल यासाठी आयसीएमआर प्रयत्नशील आहे.

आयसीएमआर ने कमी वेकात अधिक आणि अचूक कोरोना चाचण्या करण्यासाठी रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट मोठ्या प्रमाणावर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आयसीएमआरने एसडी बायोसेन्सर कंपनीला रॅपिड अँटीजेन डिटेक्शन किट बनवण्याची परवानगी दिली आहे. मात्र केवळ एक कंपनी आवश्यक त्या किट किंवा चाचणी करू शकणार नसल्याने आयसीएमआर ने अशी चाचणी विकसित केलेल्या सर्व उत्पादकांकडून रॅपिड अँटीजेन डिटेक्शन किट सह जलद चाचच्या करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

कोणकोणत्या संस्थांचा यामध्ये आहे सहभाग -  

  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स - दिल्ली
  • एस एम एस मेडिकल कॉलेज - जयपूर
  • किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी -लखनऊ
  • कस्तुरबा हॉस्पिटल फॉर इन्फेक्शन डिसीज - मुंबई
  • पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च - चंदिगढ
  • जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन ऍण्ड रिसर्च  - पुद्दुचेरी
  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉगी - केरळा
  • बँगलोर मेडिकल कॉलेज ऍन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट - बंगळुरू,
  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ऍण्ड न्यूरोसायन्स - बंगळुरू

प्रमाणीकरणासाठी आवश्यक निकष 

  • प्रत्येक प्रमाणीकरणासाठी किमान 300 जलद प्रतिजैविक चाचण्या आवश्यक असतील.
  • चाचणीसाठी आवश्यक अत्याधुनिक किमान साधने आवश्यक असतील. 
  • चाचणीच्या प्रमाणीकरणात सामील असलेल्या तांत्रिक कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याची क्षमता.

focus on rapid antigen testing to prevent corona in monsoon

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Retirement: ३९० हून अधिक विकेट्स अन् २७०० धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूची निवृत्तीची घोषणा! १४ वर्षांनंतर केलं अलविदा

Navi Mumbai jewellery Shop Robbery video : बुरखा घालून आले अन् बंदूक दाखवत भरदिवसा 'ज्वेलरी शॉप' लुटून निघूनही गेले!

Pune land scam: बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट; तहसीलदारांचा जामीन फेटाळला, कोर्टात नेमकं काय घडलं?

Viral Video: धावत्या रिक्षात कपलचा सुरु होता रोमान्स, लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झाला अन्...

Latest Marathi News Live Update : महापालिकेसाठी उमेदवार उद्यापासून सादर करणार अर्ज

SCROLL FOR NEXT