Ganapati Utsav mumbai esakal
मुंबई

Ganesh Utsav : अंधेरीचा राजा! गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी 'हे' नियम पाळा; मंडळाचा अजब फतवा

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईतल्या अंधेरीचा राजा गणपती मंडळाने एक अजब फतवा काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण तुम्हाला बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना ड्रेसकोड पाळावा लागणार आहे. त्याशिवाय दर्शन घेता येणार नाही.

19 तारखेला संपूर्ण देशभरात गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. सर्व मंडळांची गणपतीसाठीची तयारीदेखील जवळपास पूर्ण झाली आहे. अशातच आता मुंबईतील प्रसिद्ध अंधेरीचा राजा गणेशोत्सव मंडळानं गणेशभक्तांसाठी अजबच फतवा काढला आहे. या गणेशोत्सव मंडळानं बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या गणेश भक्तांसाठी ड्रेसकोड ठेवला आहे. महिला आणि पुरूषांसाठी हा ड्रेसकोड लागू होणार आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

अंधेरीचा राजा गणेश मंडळाच्या बैठकीमध्ये भक्तांची सुरक्षा आणि ड्रेसकोडबाबत चर्चा झाली होती. अखेर तो निर्णय घण्यात आलेला असून विशिष्ट ड्रेसकोड नसेल तर भक्तांना प्रवेश मिळणार नाही. मागील वर्षी देखील या निर्णयाची घोषणा झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी मंडळाच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. मात्र मंडळाने अशा सर्व विरोधाला न जुमानता ड्रेस कोडचा नियम लागू केला. तसाच निर्णय यंदाही घेण्यात आलाय.

बाप्पाच्या दर्शनसाठी 'हे' कपडे चालणार नाहीत

लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी महिलांनी शॉर्टस, स्कर्ट आणि पुरूषांनी हाफ पँट घालून आल्यास दर्शन घेता येणार नाही आहे. 14 वर्षावरील सर्वांनाच हा ड्रेस कोड बंधनकारक असणार आहे. असे माहितीफलक परिसरात डकवण्यात आलेले आहेत. मागच्या पंधरा वर्षांपासून ड्रेसकोडचा नियम असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT