मुंबई

बेस्टला केलेल्या मदतीचा हिशोब घेऊन पुढील मदत करणार: मुंबई पालिका

समीर सुर्वे

मुंबई:  बेस्ट उपक्रमाला देण्यात आलेल्या 2 हजार 100 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीचा हिशोब घेऊनच पुढील मदत करण्यात येणार असल्याची स्पष्ट भूमिका महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीच्या बैठकीत पालिकेने आता पर्यंत बेस्ट केलेल्या केलेल्या मदतीचा मुद्दा उपस्थित केला.आर्थिक मदतीच्या खर्चाचा हिशोब बेस्टने देणे अपेक्षित होते. मात्र,तो अद्याप देण्यात आलेला नाही. त्यामुळे यापुढे आर्थिक मदत देण्यापूर्वी त्यांच्याकडून खर्चाचा हिशोब घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.

पालिकेने आता पर्यंत बेस्टला 2 हजार १०० कोटी रुपयांची मदत केली आहे. यंदासाठी 1 हजार 500 कोटींची मदत देण्यात येणार होती. ही मदत आता 500 कोटी रुपयांनी कमी केली असली तरी 400 कोटी बेस्टच्या परिवहन विभागाला देण्यात आले आहे. परिवहन विभागासाठी दिलेला पैसा बेस्टने परस्पर विद्युत विभागासाठी वळवला, असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला. आता पर्यंत देण्यात आलेल्या 2 हजार 100 कोटी रुपयांची मदत केली असून त्याचा हिशोब दिलेला नाही असेही त्यांनी नमूद केले.

यावर बेस्ट प्रशासनाकडून माहिती सादर केली जात नसल्याबद्दल स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे बेस्टने अगोदर दिलेल्या मदतीचा हिशोब सादर करत नाहीत तो पर्यंत त्यांना पुढील मदत देऊ नका असे निर्देश जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिले.

---------------------------

(संपादनः पूजा विचारे)

The following help will be given BEST Mumbai Municipal Corporation

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणातील आरोपीवर सर्व सात गुन्हे सिद्ध झालेत- न्यायाधीश

Palghar: पालघर बनणार चौथी मुंबई ! गेमचेंजर प्रकल्पांना गती येणार, कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Malware Alert : लॅपटॉप-कॉम्प्युटरवर WhatsApp वापरताय? CERT-In ने दिला गंभीर इशारा, 'हा' मेसेज बघताच बँक अकाउंट होईल रिकामं

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Shaktipeeth Highway : अदानी-अंबानींसाठी सुपीक जमीन जाणार? 'शक्तिपीठ' महामार्गावरून सांगलीतील शेतकऱ्यांचा एल्गार, जिल्हा परिषदेवर वाढला दबाव

SCROLL FOR NEXT