police fir sakal media
मुंबई

नवी मुंबई: पोलिसांवर चप्पल भिरकावली; तीन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : पोलिसांवर चप्पल भिरकावून त्यांच्यासोबत धक्काबुक्की करणाऱ्या तीन महिलांसह चौघांविरोधात नेरुळ पोलिसांनी (Nerul Police) सरकारी कामात अडथळा आणून धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल (police complaint filed) केला आहे. शुक्रवार (ता. ४) सायंकाळी ही घटना नेरुळ पोलिस ठाण्यासमोर घडली होती. आयशा रफीक शेख, आयशा समीर शेख आणि रेश्मा शेख व रफीक शेख (चौघेही राह. दारावे, नेरुळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजारी राहणाऱ्या टुंपा दलाई या महिलेसोबत किरकोळ कारणावरून वाद होऊन भांडण झाले होते. त्यामुळे टुंपा दलाई ही महिला नेरुळ पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेली होती.

त्यानुसार नेरुळ पोलिसांनी आयशा रफीक शेख, आयशा समीर शेख, रेश्मा या तिन्ही महिलांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. त्यामुळे या तिन्ही महिलांनी नेरुळ पोलिस ठाण्यात जाऊन टुंपा दलाई या महिलेसोबत हुज्जत घालून भांडण करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी त्यांना समजावून पोलिस ठाण्याबाहेर काढल्यानंतर देखील त्यांच्यात जोरजोरात भांडण सुरूच राहिल्याने महिला पोलिसांसह इतर पोलिस कर्मचारी त्यांना समजावण्यासाठी रस्त्यावर गेले होते.

तेव्हा एका महिलेने पोलिसांवर चप्पल भिरकावली. तसेच महिला पोलिस व इतरासोबत धक्काबुक्की केली. त्यानंतर सदर महिलेसोबत असलेल्या इतर महिलांनी व पुरुषाने देखील पोलिसांना बघून घेण्याची धमकी देऊन त्यांना शिवीगाळ केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

AI Superintelligence Race: AI माणसांना संपवू शकतो; Anthropic च्या संशोधकाने राजीनामा देत दिला गंभीर इशारा!

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

SCROLL FOR NEXT