Chandrakant Patil_Modi 
मुंबई

PM मोदींच्या दिर्घायुष्यासाठी चंद्रकांत पाटलांचं मुम्बादेवीला साकडं!

काल पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आंदोलकांनी रोखला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : पंजाबच्या दौऱ्यादरम्यान PM नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा ताफा अडवण्यात आल्यानं भाजपनं काँग्रेसविरोधात रान उठवलं आहे. याप्रकरणावरुन दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यरोप होत आहेत. दरम्यान, मोदींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा दावा करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakat Patil) यांनी मुंबईचं ग्रामदैवत मुम्बादेवीच्या मंदिरात जाऊन मोदींसाठी प्रार्थना केली. तसेच यावेळी त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. (For longevity of PM Modi Chandrakant Patil Prayed Mumbadevi)

पाटील म्हणाले, "काल पंजाबमध्ये जी घटना घडली ते आठवलं तरी मनात भीती निर्माण होते. आपण टिव्हीवर सगळं पाहिलं. पण केवळ आणि केवळ परमेश्वराची कृपा तसेच भविष्यात मोदींच्या हातून काहीतरी मोठं मिशन व्हायचंय म्हणून ते वाचले. ताफा अडवल्यानंतर पंतप्रधान मोदींची गाडी अशा स्पॉटला उभी होती जिथं कोणीही हल्ला केला असता. चारही बाजूंनी त्यांचे सुरक्षा रक्षक होते. त्या ठिकाणी हातपाई झाली असतील त्यात त्यांचा प्राणही गेला असता, अशा वेळाला एखाद्या भाजप कार्यकर्त्याच्या भावना अनावर होऊ शकतात. त्यामुळं मी अवधूत वाघांना सांगेन की, भावना बरोबर आहेत. पण शब्द जपून वापरायला हवेत"

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी मोदींचा एक व्हिडिओ शेअर करत विरोधकांवर टीका केली आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्यांनी म्हटलं की, "विरोधकांनी कितीही प्रयत्न केले, तरी त्यांचे कपटी हेतू कधीही पूर्ण होऊ शकणार नाहीत. नरेंद्र मोदी नावाच्या वादळासमोर कोणाचाही टिकाव लागू शकत नाही. तुम्ही षडयंत्रांचे अनेक जाळे जरी पसरवले, तरी ही ज्वाला आता पेटून उठणार आहे. तुम मुझको कब तक रोकोगे?"

पंजाबमधील दौऱ्यात नक्की काय घडलं होतं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ही सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर सुमारे 15 ते 20 मिनिटे अडकून पडला होता. सुरक्षेच्या कारणस्तव पंतप्रधान मोदींना पुन्हा भटिंडा विमानतळावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्शदीप सिंगला संधी मिळणार? कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग XI?

SCROLL FOR NEXT