मुंबई

क्लासला जात असताना जबरदस्तीने केला बलात्कार, यामुळे फुटली अत्याचाराला वाचा

सकाळ वृत्तसेवा


नवी मुंबई : घणसोली भागातील एका १२ वर्षीय मुलीवर त्याच भागातील रहिवाशी असणाऱ्या दोघा सख्या भावांनी लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मागील दीड महिन्यांपासून दोघे भाऊ पिडीतेवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे तपासात समोर 
आले आहे. 


दरम्यान रबाळे पोलिसांनी दोन्ही भावांवर बलात्कारासह विनयभंग तसेच पोक्‍सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील मोठ्या भावाचे नाव अश्विन भुवनेश्वर पाठक (२४) असे असून त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. तर त्याचा लहान भाऊ हा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरु 
केली आहे.  

ही बातमी वाचा ः बलात्काऱ्यांना निष्ठूर आणि कठोर शिक्षा आवष्यक- उच्च न्यायालय
या घटनेतील पिडीत मुलगी व आरोपी हे एकाच परिसरातील रहिवाशी असल्याने ते दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पिडीत मुलगी ही १० नोव्हेंबर रोजी क्‍लासला जात असताना आरोपी अश्विन याने तिला जबरदस्तीने आपल्या घरामध्ये नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच सदर प्रकाराची माहिती तिने कुणाला देऊ नये यासाठी तिला धमकावले. त्यामुळे पिडीतेने घडल्या प्रकाराची माहिती कुणालाही दिली नाही. याचाच फायदा उचलत अश्विनने पुन्हा पिडीतेवर अत्याचार केले. दरम्यान हा सर्वप्रकार अश्विनच्या १७ वर्षीय लहान भावाने पाहिल्याने त्यानेही पिडीतेला घरामध्ये नेत तिच्यासोबत अश्‍लिल चाळे केले.


वारंवार हा प्रकार घडत असल्याने पिडीतेने अखेर सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने मंगळवारी (ता.२४) रात्री रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अश्विन पाठक याच्यावर बलात्कारासह धमकावणे व पोक्‍सो कलमान्वये तर त्याच्या लहानभावावर विनयभंगाचा  गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले. 
अश्‍विनला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला ३० डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्याच्या अल्पवयीन भावाला बाल न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT