Manohar-Joshi Esakal
मुंबई

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती गंभीर पण स्थिर अवस्थेत

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना सोमवारी रात्री मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना सोमवारी रात्री मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सेमीकोमाच्या गंभीर स्थितीत आयसीयूत उपचार सुरु असून सध्या त्यांच्या मेंदूतील रक्तस्त्राव स्थिर असून उपचार सुरु असल्याचे हिंदुजा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तुर्तास त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मनोहर जोशी यांना सोमवारी रात्रीपासूनच अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना उशिरा रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल करताना ते गंभीर स्थितीत होते. मात्र त्यांना व्हेंटिलेटरवरची गरज लागत नसून ते स्वतःहून श्वास घेत असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. मात्र त्यांना ब्रेन ट्यूमर स्थितीतील गुंतागुंत आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. प्रकृती स्थिर असली तरी देखील वैद्यकीय उपचारातील गंभीर व्यवस्थापनाची गरज असल्याचे डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२० लाखांचं पॅकेज, वर्क फ्रॉम; IT इंजिनिअरने आईला का संपवलं?

Pune Nashik Highway: पिंपळवंडीत तरुणाला मारहाण; कुकडी नदीच्या पुलावरून पडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

SCROLL FOR NEXT