वसई ः पुलाच्या मागणीसाठी घोड्यावरून जाताना राजकुमार चोरघे.  
मुंबई

पुलासाठी बॅंडबाजा अन्‌ घोड्यावरून वरात

सकाळ वृत्तसेवा

वसई ः चोहोबाजूनी समुद्राने वेढलेल्या आणि अनेक वर्षे खडतर प्रवास करणाऱ्या नायगाव-पाणजूवासियांसाठी वसई-विरार महापालिकेचे माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी अनोखी शक्कल लढवत चक्क घोड्यावर स्वार होत बॅंडबाजा घेऊन तहसीलदार कार्यालय गाठले.

नायगाव ते पाणजू पूल लवकरात लवकर उभारावा, या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देत त्यांनी याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. पाणजू बेटाच्या पुलाबाबत दिलेले निवेदन सरकारकडे पाठवण्यात येईल, असे आश्‍वासन निवासी तहसीलदार उमाजी हेळकर यांनी या वेळी दिले. 

भाईंदर ते नायगाव रेल्वेस्थानकादरम्यान पाणजू बेट आहे. या ठिकाणी पाच हजारांहून अधिक लोकवस्ती आहे. नागरिकांना रस्ता नसल्याने बोटीने शहरात व गावाकडे यावे लागते. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. गावातील रुग्णांसह विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत आहे. खाडीवर पूल व्हावा, अशी मागणी सरकार दरबारी अनेकदा येथील नागरिकांनी केली; परंतु त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळेच मागणीसाठी वसई पारनाका ते तहसीलदार कार्यालय येथे माजी नगरसेवक राजकुमार चोरघे हे बॅंडबाजासोबत घेत घोड्यावर बसून हातात फलक घेऊन गेले. 

नायगाव, पाणजू गावातील नागरिकांची सुविधांअभावी गैरसोय होत आहे. ज्येष्ठांपासून, रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिकांचे दळणवळणास रस्ता नसल्याने हाल होत आहेत. त्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. याबाबत लवकरच मंत्रालयातदेखील जाणार आहे. 
राजकुमार चोरघे, माजी नगरसेवक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

Sujay Vikhe Patil: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यामागे हाच हेतू : माजी खासदार सुजय विखे पाटील

Wide बॉलवर Six! क्रिकेटच्या इतिहासात असे विचित्र प्रथमच घडले; पाकिस्तानी गोलंदाजाने बाऊन्सर टाकला तो थेट सीमापार Video Viral

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप यादीमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव

SCROLL FOR NEXT