ED esakal
मुंबई

Patra Chawl : पत्राचाळ घोटाळ्यात माजी मुख्यमंत्र्यांचा सहभाग? EDच्या आरोपपत्रामुळं खळबळ!

ईडीनं पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ४ हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीनं ४ हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. पण यामध्ये आता एक नवा ट्विस्ट आला असून ईडीच्या आरोपपत्रात एका माजी मुख्यमंत्र्याच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळं खळबळ उडाली आहे. पण हे माजी मुख्यमंत्री नक्की कोण आहेत? त्यांचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. (Former Maharashtra CM mentioned in ED charge sheet of Patra Chawl scam case)

ईडीनं आपल्या आरोपपत्रातून दोन महत्वाच्या गोष्टी मांडल्या आहेत. यामध्ये २००६-२००७ या कालावधीत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यामध्ये बैठक पार पडली होती. या बैठकीनंतरच गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून राकेश वाधवान यांच्याकडे पत्राचाळच्या विकसनाचं काम देण्यात आलं होतं. पण हे माजी मुख्यमंत्री कोण होते याच्या नावाचा उल्लेख ईडीनं आरोपपत्रात केलेला नाही. या घोटाळ्यात १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं ईडीनं चार्जशीटमध्ये म्हटलंय.

दरम्यान, पत्राचाळ प्रकरणातील घडामोडींची माहिती संजय राऊत यांना होती. तसेच या घोटाळातील सूत्रधार हे संजय राऊतच आहेत असं ईडीनं आरोपपत्रात म्हटलं आहे. या घोटाळ्यामध्ये राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं म्हटलं आहे.

सामच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाधवान बंधूंसोबत संगनमत करून संजय राऊतांनी पत्राचाळ प्रकरणातून पैसे कमावले असल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे. पत्राचाळ प्रकरणातले प्रमुख आरोपी संजय राऊतच असल्याचंही यात म्हणटलं आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असून राऊतांच्या परदेश दौऱ्याचे पैसे याच कंपनीतून आले आहेत, असाही उल्लेख या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

SCROLL FOR NEXT