Kishori Pednekar esakal
मुंबई

Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर, काय आहे प्रकरण?

महापालिकेत कोविड काळात मृतदेहाच्या बॅग खरेदी प्रकरणात आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात ईडीनं गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेत कोविड काळात मृतदेहाच्या बॅग खरेदी प्रकरणात आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणाच्या संदर्भात आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाल्या होत्या.

या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने किशोरी पेडणेकर यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने किशोरी पेडणेकर यांना ४ आठवडे अटकेपासून संरक्षण दिला आहे. मात्र, तपासात सहकार्य करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. ११, १३ आणि १६ तारखेला किशोरी पेडणेकर यांना आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर रहावं लागणार आहे.

न्यायालयातील सुनावणी दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावरील सगळे आरोप फेटाळून लावले होते. निव्वळ राजकारण म्हणून आपल्याला लक्ष केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच शव पिशवी आणि इतर वस्तुंच्या खरेदीत देखील कायद्याच पालन केल्याचा पेडणेकरांनी दावा केला होता.

महिन्याभरापूर्वी ईडीने पेडणेकरांविरोधातील आरोपांप्रकरणाची कागदपत्रे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून मागवली होती. या विभागाकडून पेडणेकरांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याच्या आधारे कागदपत्रे तपासल्यानंतर ईडीनं किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पेडणेकरांवर आरोप काय?

कोविड काळात मुंबई महापालिकेकडून पालिकेच्या रुग्णालयांसाठी मृतदेहांच्या बॅग खरेदी करताना १८०० रुपयांची एक बॅग ६८०० रुपयांना विकत घेतल्याचं सांगितलं जात आहे. तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सुचनेनूसार हा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bangalore Highway : 92 पिलर अन् 3.47 किमी लांबी! पुणे-बंगळूर महामार्गावरील सर्वात मोठा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार? लोकार्पण लांबणीवर, वाचा नवीन अपडेट

ICAI CA Toppers List : डोंबिवलीचा सुपुत्र देशभर गाजला! सोहन मांजरेकर ठरला देशातील तिसरा CA टॉपर; संपूर्ण टॉपर यादी पाहा

Shubman Gill:'गिलला टी-२० संघातून का डच्चू दिला?' मोहम्मद अझरुद्दीनचा BCCI ला थेट सवाल

Eknath Shinde यांनी लोकसभेतील संख्याबळाचे गणित बदललं! NDA मध्ये बनतील शक्तिशाली नेते; जागांचे गणित पाहा...

Farmer Protest: कर्जमुक्तीच्या लढ्याचा वणवा राज्यभर! तहसील कार्यालयावर व पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी, बुलडाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT