Sanjay Pandey sakal
मुंबई

Sanjay Pandey : दिल्लीतील कोर्टाकडून माजी पोलीस आयुक्त संजय पांडेची जामिनावर सुटका

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) को-लोकेशन आणि फोन टॅपिंग प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयाने बुधवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) को-लोकेशन आणि फोन टॅपिंग प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयाने बुधवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना जामीन मंजूर केला.या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सप्टेंबरमध्ये संजय पांडे यांना अटक केली होती. एनएसई फोन टॅपिंग प्रकरणाशी संबंधित अंमलबजावणी संचालनालय (ईडी) प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच पांडेला जामीन मंजूर केला होता.

उच्च न्यायालयाने संबंधित ईडी प्रकरणात संजय पांडे यांना आधीच जामीन मंजूर केला असल्यामुळे कोर्टाला जामीन नाकारण्याचे कोणतेही कारण दिसले नाही. संजय पांडे आरोपी एक्सचेंजच्या कर्मचार्‍यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंगशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने रवी नारायण आणि चित्रा रामकृष्ण यांनाही अटक केली होती.

या प्रकरणात ईडीने अटक केलेला रवी नारायण हा तिसरा व्यक्ती होता. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर, केंद्रीय अन्वेषण ब्युरोने कथित नॅशनल स्टॉक एक्सचेंज सह-स्थान घोटाळ्यात गुन्हा नोंदवला होता. याचं प्रकरणात संजय पांडे यांना अटक करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT