मुंबई

मुंबई डबेवाल्यांची फसवणुक केल्याने संघटनेचा माजी अध्यक्ष अटकेत; दुचाकीचे आमिष दाखवत परस्पर काढले कर्ज

निलेश मोरे

घाटकोपर  : मुंबईचा डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष व प्रवक्ते सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. सुभाष तळेकर यांच्यावर मुंबईच्या डबेवाल्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 

नवी मुंबईतील एका पतपेढी संस्थेच्या मदतीने मुंबईच्या डबेवाल्यांना मोफत टीव्हीएस मोपेड ही दुचाकी देणार असल्याचे सांगून सुभाष तळेकर याने 60 डबेवाल्यांकडून त्यांची कागदपत्रे गोळा केली होती. त्यानुसार काही डबेवाल्यांना दुचाकी मिळाल्या; परंतु त्यांना आरटीओचा परवाना नव्हता. सोबतच अनेक डबेवाल्यांना दुचाकी मिळाली नाहीच; परंतु त्यांच्या खात्यातून पैसे देखील वजा होण्यास सुरुवात झाली. तसेच काही डबेवाल्यांना कर्ज फेडण्यासाठी पतपेढ्यांकडूनही फोन येऊ लागले होते. आपली फसवणूक झाल्याचे कळताच काही डबेवाल्यांनी 4 फेब्रुवारी 2019 रोजी घाटकोपर पोलीस ठाण्यात सुभाष तळेकर यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी अखेर सुभाष तळेकर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी सुभाष तळेकर याच्या व्यतिरिक्त डबेवाला असोसिएशनचे माजी सचिव विठ्ठल सावंत, सदस्य दशरथ केदारे, साई इंटरप्राईजेसचे राकेश प्रसाद आणि भावेश दोषी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून घाटकोपर पोलिस पुढील तपास करत आहे. 

डबेवाल्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सुभाष तळेकराला कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशा व्यक्तींमुळे डबेवाल्यांची प्रतिमा मलिन होत आहे. आरोपीला कमीतकमी 10 वर्षे शिक्षा मिळावी, अशी आमची डबेवाला संघटनेची मागणी आहे. 
- सचिन गावडे,
तक्रारदार 

तपास डबेवाल्यांची एकूण 6 लाख 578 रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून 4 जानेवारी 2021 ला पुणे जिल्ह्यातून आरोपीला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात विठ्ठल सावंत, दशरथ केदारे, राकेश प्रसाद आणि भावेश जोशी हेदेखील दोषी आढळले असून त्यांना लवकरच अटक करू. 
- समाधान चव्हाण,
तपास अधिकारी, घाटकोपर पोलीस ठाणे 

Former president of Mumbai Dabewala arrested for cheating

---------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा सरकारला कडक इशारा! दोषमुक्तीच्या याचिकांवर विलंब केला तर थेट अवमान कारवाई... इतर राज्यांना संदेश

Washim News: सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाची एन्ट्री;जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; दिग्गजांना हादरा

Latest Marathi News Live Update : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेची सर्व तयारी पूर्ण; उद्या मुख्य यात्रा

Pimpri News: अपघात आणि बेपत्ता नोंद एकाच पोलीस ठाण्यात, तरी तपासाची तसदी घेतली नाही; CRPF जवानाच्या मृत्यूचा ५ दिवसांनी उलगडा..

Buldhana News: तहसीलदारावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न; रेतीमाफियांची मुजोरी वाढली; सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले वाहन

SCROLL FOR NEXT