मुंबई

शिवसेनेला धक्का! माजी आमदार तृप्ती सावंत यांचा भाजपात प्रवेश

शर्वरी जोशी

मुंबई : मुंबईत लवकरच पालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे. या निवडणुकांना एक वर्षाचा अवकाश असला तरीदेखील भाजपाकडून पालिकेवर सत्ता मिळवणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर भाजपाचं मोठं आव्हान असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच आता शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या पत्नी माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी तृप्ती सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, नितेश राणे, अतुल भातखळकर आणि इतरही नेते यावेळी उपस्थित होते.

पालिका निवडणुकांना केवळ एक वर्षाचा कालावधी बाकी असतांना तृप्ती सावंत यांनी शिवसेनेची साथ सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तसंच त्यांच्या या पक्ष बदलामुळे भाजपाला आगामी निवडणुकांमध्ये फायदा होईल की तोटा याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

दरम्यान,  २०१५ मध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या तृप्ती सावंत यांना २०१९ च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने तिकीट नाकारलं होतं. त्यांच्या ऐवजी मुंबई पालिकेचे तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट देण्यात आलं होतं. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला होता.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT