found dead body in vashi khadi police navi mumbai crime esakal
मुंबई

Navi Mumbai : वाशी खाडीमध्ये सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

वाशी खाडीमध्ये रविवारी दुपारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळुन आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : वाशी खाडीमध्ये रविवारी दुपारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळुन आला आहे. कुजलेल्या अवस्थेतील सदर मृतदेह पोलिसांनी स्थानिक मच्छिमार व अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढुन महापालिका रुग्णालयात पाठवुन दिला आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करुन मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

वाशी खाडीमध्ये रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी वाशी खाडी पुलावर धाव घेऊन स्थानिक मच्छीमार व अग्निशमन दलाच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेतील सदर व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर सदर मृतदेह वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवुन दिला आहे.

वाशी खाडीत सापडलेला मृत व्यक्ती अंदाजे 40 ते 45 वयोगटातील असून त्याचे संपुर्ण शरीर कुजलेले आहे. सदर मृत व्यक्तीच्या अंगावर काळी पॅन्ट व अंगात शर्ट आहे. कुजलेल्या अवस्थेतील सदर व्यक्तीचा दोन ते तीन दिवसापूर्वी पाण्यात पडुन मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

त्यामुळे आजुबाजुच्या परिसरातून बेपत्ता झालेल्या व्यक्तींची पोलिसांकडून माहिती घेण्यात येत आहे. वाशी खाडी पुलावरुन उडी टाकुन अनेक व्यक्ती आत्महत्या करत असतात, त्यामुळे या व्यक्तीने आत्महत्या केली आहे, कि तो पाण्यात पडला,

अथवा तो दुसरीकडुन कुठून वाहुन आला? याबाबत पोलिसांकडुन अधिक तपास करण्यात येत आहे. या व्यक्तीबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी वाशी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT