मुंबई

पैशाच्या वादातून त्यांनी बारमालकाचा गळाच आवळला...

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : सीबीडीतील "माया बार'चा मालक वशिष्ठ यादव याच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. सुमित मिश्रा (23), अब्दुल शुकूर (35), अविनाश कारकेरा (25) आणि मोहम्मद शरीफ (32) अशी या चौघांची नावे असून यातील सुमित आणि वशिष्ठ यादव यांच्यामध्ये तीन महिन्यांपूर्वी पैशांवरून भांडण झाले होते. याच वादातून सुमितने वशिष्ठ यादव याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. 

सीबीडीतील माया बारचा चालक-मालक असलेला वशिष्ठ यादव याचा मृतदेह गत सोमवारी (ता.10) सकाळी कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील बेलांपल्ली येथील कुक्के गावालगतच्या जंगलामध्ये आढळून आला होता. तेथील पेरदुर-हिरीयादका पोलिसांनी सदरचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदन केले असता, त्यांचा मृत्यू वायरने गळा आवळून झाल्याचे आढळून आले होते. मृतदेहाची ओळख पटविण्यात आल्यानंतर मृतदेह नवी मुंबईतील सीबीडी परिसरातील माया बारचे चालक-मालक वशिष्ठ यादव यांचा असल्याचे आढळून आले होते. 

त्यामुळे कर्नाटक पोलिसांच्या पथकाने केलेल्या तपासात या हत्या प्रकरणातील मारेकरी ज्या कारमधून पळाले होते, त्या कारचा पोलिसांनी शोध घेऊन ती जप्त केली. त्यानंतर पोलिसांनी सुमित मिश्रा, अब्दुल शुकूर, अविनाश कारकेरा आणि मोहम्मद शरीफ या चौघांना अटक केली. यातील सुमित हा पूर्वी वशिष्ठ यादव याच्या माया बारमध्ये काम करत होता; तर इतर तीन जण हे ट्रॅव्हल्स कंपनीत कामाला होते. 

दरम्यान, सुमित आणि वशिष्ठ यादव यांच्यात तीन महिन्यांपूर्वी पैशांवरून भांडण झाले होते. त्यानंतर सुमितने बारमधील काम सोडले होते. याच आर्थिक वादातून सुमितने माया बारचा मालक वशिष्ठ यादव यांची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT