high_court 
मुंबई

मोठी बातमी - उच्च न्यायालयाच्या चार अधिकाऱ्यांच्या बदल्या... 

- सुनीता महामुणकर

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल एस.बी.आगरवाल यांची नगर दिवाणी आणि सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश पदावर बदली करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव एस.जी.डिगे यांची उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल पदावर बदली करण्यात आली आहे. डिगे यांच्याकडे मेडिएशन केन्द्राची अतिरिक्त जबाबदारीही होती. 

उच्च न्यायालय प्रशासनाने चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी परिपत्रकाद्वारे जाहीर केल्या आहेत. उच्च न्यायालयाचे (अपिलेट शाखा) रजिस्ट्रार (दक्षता-1) ए.जे. मंत्री यांची बदली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. मंत्री यांच्याकडे उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेचे प्रोथोनोटरी आणि सिनियर मास्टर पदाची अतिरिक्त जबाबदारीही होती.

नगर दिवाणी आणि सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश एम.डब्लू.चांदवानी यांची बदली उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेचे प्रोथोनोटरी आणि सिनियर मास्टर पदावर करण्यात आली आहे. त्याचबरोबर अपिलेट शाखेच्या रजिस्ट्रार (दक्षता-1) पदाची अतिरिक्त जबाबदारीही त्यांच्यावर आहे.

संपादक- सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

SCROLL FOR NEXT