Borivali Building Collapsed  Sakal
मुंबई

Borivali Building Collapsed : चार मजली इमारत कोसळली; व्हिडिओ व्हायरल

निनाद कुलकर्णी

Building Collapsed In Mumbai Borivali : मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील साईबाबा नगरमधील गितांजली नावाची चार मजली इमारत कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, ढिगारा बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. बीएमसीकडून ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती. त्यामुळे येथे वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबियांना आधीच बाहेर काढण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही येथे कुणी अडकले आहे का? याचा शोध घेण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांकडून घेतला जात आहे.

दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, ढिगारा बाजूला करून बाचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजून 34 मिनिटांनी इमारत कोसळल्याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाला लेव्हल 2 चा कॉल मिळाला होता. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू केले आहे.

दरम्यान, आता नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार बीएमसीकडून ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती. तसेच येथे वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबियांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली आहे. मात्र, यानंतरही या ठिकाणी कुणी वास्तव्यास होतं का? याचा शोध जवानांकडून घेतला जात आहे.

कोसळलेली ही इमारात 30 ते 35 वर्षे जुनी असून, इमारतीच्या रिडेव्हलपमेंटसाठी बिल्डरसोबत करार झाला होता. त्यानुसार आज आज सकाळीच या इमारतीतील कुटुंबियांनी घरे खाली केली अशी माहिती स्थानिक आमदार सुनिल राणे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee TMC Resignation : ममता बॅनर्जींना तगडा झटका; अत्यंत विश्वासू चंद्रिमा भट्टाचार्य यांनी तृणमूल पक्ष प्रमुख पदाचा दिला राजीनामा

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: विकेंडला रायगडला जाणार आहात? देवकुंड, ताम्हाणीसह अनेक पर्यटनस्थळांवर लागू झाले कडक निर्बंध

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT