corona virus Sakal
मुंबई

सक्रिय रुग्णसंख्येत चौपट वाढ

मुंबईत स्थिती नियंत्रणात; परिस्थितीवर लक्ष

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील कोविड रुग्णसंख्या हळूहळू वाढत असल्याचे समोर येत आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सापडलेल्या कोविड रुग्णांची तुलना केल्यास एवढे रुग्ण संपूर्ण एप्रिल महिन्यात सापडले होते. मे महिन्यामध्ये सक्रिय रुग्णही सुमारे चौपट वाढले आहेत; मात्र अशा परिस्थितीतही मुंबईतील स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.

मे महिन्याच्या पंधरवड्यात एप्रिल महिन्याच्या तुलनेत ९० टक्के रुग्णांची नोंद झाली. १ मे ते १४ मे या कालावधीत मुंबईत १,६४१ कोविड रुग्ण आढळले; तर संपूर्ण एप्रिल महिन्यात एकूण १,८२७ एवढे रुग्ण सापडले होते. महाराष्ट्रातही २,३५३ रुग्ण आतापर्यंत नोंदले गेले आहेत. म्हणजेच जवळपास ६० टक्के भार हा फक्त पहिल्या १५ दिवसांत अनुभवायला मिळाला. त्याच तुलनेत एप्रिलमध्ये ३,७०८ एवढे रुग्ण नोंदवण्‍यात आले होते.

रुग्ण वाढत आहेत, ही बाब जरी खरी असली, तरी यातून चिंता करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे, मुंबई आणि पुण्यात पुन्हा रुग्ण वाढत आहेत; तर इतर जिल्ह्यांमध्ये फक्त एक अंकाने रुग्ण वाढत आहे, असे राज्याच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी सांगितले, की आम्ही कोविडच्या सद्यस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सध्याची परिस्थिती नियंत्रणात असून मुंबईकरांना काळजी करण्याची गरज नाही. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असेही ते म्हणाले.

रुग्णसंख्येचे निरीक्षण

मुंबई महापालिकेने शुक्रवारपर्यंतच्या सात दिवसांत रुग्णसंख्येचे निरीक्षण केले. त्यापैकी के पश्चिम प्रभागात १४२, एच पश्चिम प्रभागात १०६, जी दक्षिण ६६ आणि डी प्रभागात ६२ रुग्ण आहेत. एप्रिलमध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. मे महिन्यातील पहिल्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (ता. १३) झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT