Fraud Attempt Using DP of Reliance Brand CEO crime mumbai police esakal
मुंबई

Mumbai Crime : रिलायन्स ब्रँडच्या सीईओचा डीपी वापरत फसवणुकीचा प्रयत्न

रिलायन्स ब्रँड्सच्या सीईओचा फोटो डीपीवर ठेवून सीनियर व्हाइस प्रेसिडेंटची फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रिलायन्स ब्रँड्सच्या सीईओचा फोटो डीपीवर ठेवून सीनियर व्हाइस प्रेसिडेंटची फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी सतर्कता दाखविल्यामुळे फसवणूक करणारा अपयशी ठरला. या प्रकरणी त्यांनी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीकेसीमध्ये जिओ वर्ल्ड ड्राइव्ह या ठिकाणी मनीष मित्तल हे टेक्नॉलॉजी रिलायन्स ब्रँड्सचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत, तर दर्शन मेहता हे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत. 2 मे रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास त्यांच्या मोबाइलवर एका व्हॉट्सअॅप क्रमांकावरून मी दर्शन मेहता असून, तुम्हाला वेळ आहे का, अशी विचारणा केली.

या क्रमांकावर मेहता यांचा डीपी असल्याने, मित्तल यांनी त्याच्यावर विश्वास ठेवत काय काम आहे, असे विचारले. तेव्हा ते मीटिंगमध्ये व्यस्त असून, त्यांच्या एका मित्राला गिफ्ट कार्ड पाठवायचे आहे, जे पेटीएममधून खरेदी करा, असे मित्तल यांना मेसेजवरून सांगण्यात आले. इतकेच नव्हे, तर ते पैसे नंतर देतो, असेही संदेशात नमूद करण्यात आले होते.

मात्र, तो मोबाइल क्रमांक हा मेहता यांचा वापरता मोबाईल क्रमांक नसल्याने, मित्तल यांना संशय आला आणि त्यांनी मेसेज पाठविणाऱ्याला त्याची ओळख विचारली. त्यावर पुन्हा तो मीटिंगमध्ये असल्याचे म्हणाला आणि संशय बळावल्याने मित्तल यांनी कोणतेही गिफ्ट कार्ड पाठविले नाही.

त्यानंतर, त्यांनी मेहताना संपर्क करून, संबंधित मेसेजबाबत विचारले, तेव्हा त्यांना असा कोणताही मेसेज पाठविला नसल्याचे सांगितले. त्यानुसार, मेहता यांचे नाव आणि फोटोचा भामट्यांकडून चुकीचा वापर होत असल्याचे उघड झाले आणि त्यांनी या प्रकरणी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT