मुंबई

मालवणी ते मेरीलँड, युथ एक्सचेंजतंर्गत मुंबईची दोन मुलं जाणार अमेरिकेला

अमेरिकेत जाणाऱ्या मुलांमध्ये निवड होण्यासाठी त्यांना पाच टप्प्यांची कठोर प्रक्रिया पार करावी लागली.

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत राहणारी दोन किशोरवयीन मुलं युथ एक्सचेंज कार्यक्रमातंर्गत (youth exchange programme) उद्या अमेरिकेला (America) जाणार आहेत. मालाड (Malad) येथे राहणारा अझीम शेख (१७) अमेरिकेतील मेरीलँड (Maryland) येथील एका कुटुंबासोबत राहणार आहे, तर गोरेगावमध्ये राहणारी रिया यादव (१६) टेक्सासला जाणार आहे. देशातील एकूण २८ शहरातून ९०० अर्ज आले होते. त्यातून युथ एक्सचेंज कार्यक्रमासाठी ४० मुलांची निवड झाली. त्यात मुंबईतून अझीम आणि रियाची निवड झालीय.

अमेरिकेत जाणाऱ्या मुलांमध्ये निवड होण्यासाठी त्यांना पाच टप्प्यांची कठोर प्रक्रिया पार करावी लागली. एएफएस आणि नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने युथ एक्सचेंज शिष्यवुत्ती आयोजित केली होती. ही परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अझीम आणि रियाला लेखी परीक्षा, मुलाखत आणि इंग्लिश स्पीकिंग टेस्ट आणि ग्रुप डिस्कशन परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागले.

अमेरिकेत गेल्यानंतर तिथे या मुलांचे शिक्षण सुरु राहणार आहे. अझीम बारावीत असून विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. मालवणी एमएचबी कॉलनी येथे तो राहतो. त्याचे वडिल टेक्निशिअन असून आई गृहिणी आहे. हे कुटुंब मूळचे नंदूरबारचे आहे.

रिया गोरेगावच्या मुरली उपाध्याय चाळीत राहते. ती पाटकर कॉलेजच्या FYJC-सायन्स शाखेत शिकत आहे. तिला डॉक्टर बनायचे आहे. तिचे वडिल सुरक्षा रक्षकाचे काम करतात. अत्यंत सामान्य घरातून येणारी ही दोन्ही मुले युथ एक्सचेंज कार्यक्रमातंर्गत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस नेत्याची भरदिवसा हत्या, आरोपीवर पोलिसांचा गोळीबार; झटापटीत पोलिस निरीक्षक जखमी

कर्नाटकात काँग्रेसचा रोज नवा खेळ, मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाची शक्यता; नाराजी दूर करण्यासाठी हालचाली

Nagpur Temple Theft Video : देवळात चोरी करण्यापूर्वी कान पकडून माफी मागितली; पण देवाने बरोबर केली शिक्षा पळून जाताना अपघात, नागपुरातील व्हिडिओ व्हायरल

AI Conversation : पावसाच्या आठवणींवर एआयशी गप्पा; संवादातून दिसली नवी झलक

Dharmendra Pradhan On Resignation जेन झींची दिशाभूल केली, राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधानांनी सोडलं मौन; पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT