nuclear plant  
मुंबई

अणुबॉम्ब निर्माण करण्यासाठी लागणारे युरेनियम जप्त

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई

सुरज सावंत, अनिश पाटील, प्रतिनिधी

मुंबई: राज्य एटीएसने (ATS) अणूबॉम्ब (nuclear bomb) निर्माण करण्यासाठी लागणारे सात किलो युरेनियम जप्त केले आहेत. 21 कोटी, 30 लाखांचे हे युरेनियम असून, यापकरणी दोघाना अटक करुन, त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. मानवी शरीरासाठी अत्यंत घातक अशा स्वरूपाचे हे युरेनियम (Uranium) आहे. युरेनियम विक्रीसाठी ग्राहक शोधत असणा-या दोघांना एटीएसच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. (From mumbai 21 crore Uranium seize by ats)एटीएसने या प्रकरणात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अटक केलेल्यामध्ये जिगर पांड्या (27) आणि अबू ताहीर (31) यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेले युरेनियम हे भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या तपासणी दरम्यान मानवी जीवनासाठी हे युरेनियम अत्यंत घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे. एटीएसने या प्रकरणात अॅटोमिक एनर्जी कायद्याअंतर्गत (1962) गुन्हा दाखल करून या प्रकरणातील तपासाला सुरूवात केली आहे. एटीएसच्या पोलिस निरीक्षक संतोष भालेकर यांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिगर पांड्या नावाचा व्यक्ती हा ठाण्यातून अनधिकृतपणे युरेनियमनच्या स्वरूपातील तुकड्यांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यामुळेच नागपाडा एटीएसने या प्रकरणात सापळा रचला होता. पोलिस निरीक्षक भालेकर यांच्या टीमने यशस्वीरीत्या हा सापळा लावून जिगर पांड्याला अटक केली. यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, मानखुर्द येथे राहणा-या अबु ताहीर नावाच्या व्यक्तीने जिगर पांड्याला युरेनियम पुरविल्याचे समोर आले. त्यामुळे नागपाडा युनिटने कचरा वेचक संघटनेच्या माध्यमातून मानखुर्द येथे छापा टाकून अबु ताहीरला अटक केली. जिगर पांड्या आणि अबू ताहिर दोघंही एकत्र महाविद्यालयात शिकत असल्यामुळे चांगले मित्र आहेत.

जिगर पांड्या आयटी कंपनीत काम करतो़, तर अबू ताहिर इनपोर्ट एक्सपोर्टचं काम करतो. दोघांनीही एनसीबी केले आहे. ताहिरच्या वडिलांचा गोवंडी येथे भंगारचा व्यवसाय होता. 5ते 6 वर्षापूर्वी त्याच्याकडे भंगार घेऊन एक ट्रक आला होता. त्यात त्यांना हे युरेनियम आढळले होते. युनिक पदार्थ असल्याने त्यांनी तो कपाटात ठेवला होता. मात्र ते युरेनियम आहे. याची त्यांना कल्पना नव्हती. अबूला जेव्हा हा तुकडा फेब्रुवारी 2021 मध्ये तो दिसला. त्यावेळी त्याने लॉकाडऊनमध्ये सोशल मिडियावर या धातूबाबत चौकशी केली. तसेच त्याचा मित्र जिगर हा आयटी कंपनीत असून तो अशा खासगी लॅबच्या मालकांच्या संपर्कात असल्याने अबूने त्याला या धातूचा एक तुकडा तपासणीसाठी दिला.

तपासणीत हे युरेनियम आहे हे लक्षात आले. त्यानंतर जिगरने हे युरेनियम 25 कोटींना विकायला काढले. याची माहिती एटीएसला फेब्रुवारीत मिळाली. या माहितीच्या आधारे एटीएसमधील एक अधिकारी गुजराती व्यावसायिक बनून गेला. त्याने त्याचा लेस मशिनचा व्यवसाय असल्याचं सांगितलं. एटीएसने तो धातू भाभा ऑटोमिक सेंटर येथे तपासणीसाठी पाठवला. दोन महिन्यानंतर युरेनियमचा अहवाल आला. तो पर्यंत एटीएसने या दोघांवर पाळत ठेवली होती. त्यात हा धातू नैसर्गिक असून मनुष्य जिवास हानीकारक असल्याचं म्हटले होते. त्यानुसार एटीएसने याची कल्पना ऑटोमिक मिनिरल्स डायरेक्टर फॉर एक्सप्लोरेशन अँड रिसर्च, अँटोमिक एनर्जी विभाग नागपूर यांना कळवले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवून एटीएसने या दोघांना अटक केली आहे. या दोघांना 12 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे

(संपादन - दीनानाथ परब)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Pune News: पुणेकरांना गुंठेवारीत दिलासा नाही! मुदतवाढ मिळाली, पण शुल्कात कपात नाही; जुन्याच दराने नियमितीकरण

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT