from thane 11 girl perform dance on kartavya path Sakal
मुंबई

Thane News : ठाण्यातील ११ विद्यार्थीनींकडून कर्तव्यपथावर नृत्य सादर

देशाच्या प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झालेल्या संचलनामध्ये ठाण्यातील मुद्रा आर्ट अकादमीच्या ११ मुलींना नृत्य सादर करण्याचा बहुमान मिळाला. या मुलींवर कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांनी ठाण्याचे नाव उंचावले असल्याची भावना व्यक्त होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Thane News : देशाच्या प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झालेल्या संचलनामध्ये ठाण्यातील मुद्रा आर्ट अकादमीच्या ११ मुलींना नृत्य सादर करण्याचा बहुमान मिळाला. या मुलींवर कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांनी ठाण्याचे नाव उंचावले असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरवर्षी प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी सर्व राज्यांना आर. डी. परेड, वंदे भारत नृत्य उत्सव आणि चित्ररथाच्या सादरीकरणासाठी नवी दिल्लीत बोलाविले जाते. राज्यातील अव्वल कलाकारांना हा मान दिला जातो.

यंदाच्या वर्षी `विकसित भारत आणि भारत लोकतंत्र की मातृ' हा विषय सादरीकरणासाठी ठेवण्यात आला होता. त्यानुसार सांस्कृतिक संचालनालयामार्फत ५० कलाकारांसह कर्तव्यपथावर सादरीकरण करण्यात आले.

यामध्ये ठाण्यातील मुद्रा आर्ट अकादमीतील ११ विद्यार्थीनींची सादरीकरणासाठी निवड केली होती. या विद्यार्थीनींना सांस्कृतिक विविधता आणि लष्करी पराक्रमाचे दर्शन घडविणारी शास्त्रीय नृत्य सादर करावयाची होती.

त्यानुसार मुद्रा आर्ट अकादमीतील आकांक्षा मिराशी, अनुजा काळसेकर, धर्मी रमानी, मेहेक मालदे, प्रक्षिका घोडके, साक्षी वाडजे, भुमिका म्हसकर, साक्षी वेंगुर्लेकर, शर्वरी सावंत, मनिषा राय, निती परसिया आदी ११ जणींची निवड झाली.

त्यांना मुद्रा आर्ट अकादमीच्या संचालिका तेजश्री सावंत, भवानी पर्फिर्मिंग आर्टचे अमय पाटील यांनी शास्त्रीय नृत्य, भरतनाट्यम आणि लोकनृत्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यानुसार त्यांनी कर्तव्य पथावर नृत्य सादर करून वाहवा मिळवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT