मुंबई

Petrol price hikes | इंधन दरवाढीमुळे सामान्यांचे आर्थिक गणित बिघडले

प्रशांत कांबळे

मुंबई  - जानेवारीपासून इंधन दरात सातत्याने वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे पाच रुपयांनी वाढ झाली. दरवाढीचा हा चढता आलेख कमी होण्याची चिन्हे नसल्याने नागरिकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. 

मंगळवारी मुंबईत पेट्रोल 34 पैसे, तर डिझेल 37 पैशांनी वाढले. इंधनदरात एकूण 71 पैशांनी वाढ झाली. त्यानतंर बुधवारी पुन्हा यात 56 पैशांची दरवाढ झाली. प्रामुख्याने डिझेल दरवाढीमुळे मालवाहतूकदारांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. कोरोना काळात उपनगरी रेल्वेसेवा विशिष्ट प्रवर्गातील कर्मचारी आणि अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासास मुभा देण्यात आली होती. त्यामुळे रेल्वेने प्रवास करता येत नव्हता. अनेकदा खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते. आता रेल्वे सुरू झाली असली तरी तिचे वेळापत्रक सोयीचे नाही. त्यामुळे खासगी वाहनांनी प्रवास करण्यावाचून पर्याय नाही. त्यात वाढत्या इंधनदरामुळे सामान्यांचे आर्थिक गणित बिघडल्याची प्रतिक्रिया राजकुमार उके यांनी दिली. 

देशात चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि मुंबई या चार महानगरांची तुलना केल्यास मुंबईत पेट्रोल, डिझेल सर्वाधिक महाग आहे. तर राज्यात सर्वाधिक डिझेल, पेट्रोलचा दर नांदेड जिल्ह्यात पेट्रोल 96.85 रूपये तर डिझेल 85.99 रुपये प्रति लिटर आहे. तर बीडमध्ये पेट्रोल 95.17 त्याचप्रमाणे गोंदिया 95.15, परभणी 95.81, रत्नागीरी 95.3 रूपये पेट्रोलचे दर वाढले आहेत. 

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Fuel price hikes common man deteriorated mumbai marathi latest updates

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ahilyanagar Traffic: पुणे अहिल्यानगर रस्ता पुन्हा कोंडीत; कासारी फाटा येथे वाहनांच्या रांगा, पोलिस कर्मचारी नेमण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : पावसाचा हाहाकार! शिरपूर तालुक्यात मका आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान

इतकी गोड चेटकीण पण पाय... प्रेक्षकांना कसा वाटला 'काजळमाया' मालिकेचा पहिला भाग? म्हणतात- थोडी ओव्हर अ‍ॅक्टिंग

Mumbai News: वडापावमध्ये चटणी नाही, चहावाला प्लॅस्टिकचे कप वापरतो! पोलिसांच्या हेल्पलाइनवर अजब तक्रारींचा पाऊस

Ranji Trophy : मोहम्मद शमीने टप्पात कार्यक्रम केला; MS Dhoni चा पठ्ठ्या शतक झळकावून एकटा नडायला गेला, पण...

SCROLL FOR NEXT